-->
अँड जयश्री सोनवणे सांगली येथे  खा.विशाल पाटील  यांच्या हस्ते लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित

अँड जयश्री सोनवणे सांगली येथे खा.विशाल पाटील यांच्या हस्ते लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित


संजीव भांबोरे
 "जनता की आवाज"

सांगली :- सोजाई आदिवासी महिला विकास फाउंडेशनच्या सचिव अँड जयश्री सोनवणे यांना ए डी फाउंडेशन महाराष्ट्र राज्य च्या वतीने आयोजित लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जीवन गौरव पुरस्कार 2025  साहित्य, कला, पत्रकारिता व सामाजिक क्षेत्रात आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर नावलौकिक करणाऱ्या उत्कृष्ट व आदर्श पत्रकार , वृत्त  निवेदिका यांना सांगली येथे दिनांक २३/०८/२०२५ रोजी  सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, मेडल देऊन कार्यक्रमाचे अध्यक्ष खासदार डॉ विशाल पाटील, सांगलीचे माजी महापौर डॉ. नितीन सावगावे यांच्या हस्ते व आदी मान्यवरांच्या उपस्थितीत देऊन सन्मानित करण्यात आले.

जयश्री सोनवणे यांचं सामाजिक व पत्रकारिता क्षेत्रामध्ये आपल्या कर्तुत्वाचा ठसा उमटवून एक विद्रोही बाणा, रोखठोकपणा उभ्या महाराष्ट्राला दाखवणारं महिला संघटन कौशल्य म्हणून उदयाला आलेलं महिलांचे कुशल नेतृत्व तथा दैनिक माझा मराठवाडा वृत्तपत्राच्या त्या निवासी संपादिका रिपब्लिकन आवाज न्यूजच्या उपसंपादिका तथा ज्ञानपंख 24 न्यूज या चॅनलच्या वृत्त निवेदिका आहेत. महिलांचे कुशल नेतृत्व म्हणून त्यांच्याकडे आज पाहिलं जातं. त्या एक पत्रकार तर आहेतच त्यासोबतच त्या एक उत्तम कवयित्री देखील आहे. जिथे कुठे महिलांवर अन्याय अत्याचार होतो. त्या ठिकाणी अन्यायाला वाचा फोडण्यासाठी त्या हजर असतात. अनेक संस्थांना भेट देऊन गोरगरिबांना मदत मिळवून देणे, सद्य परिस्थितीवर शाळा, कॉलेज या ठिकाणी जाऊन मुलींना परिस्थितीशी दोन हात कसे करायचे यावर मार्गदर्शन करणे. अनेक हॉस्पिटलमध्ये गोरगरिबांची फसवणूक होते. त्या ठिकाणी जाऊन त्यांची फसवणूक न होऊ देणे. त्याचबरोबर त्यांचे जे काही हॉस्पिटलचे बिल असते ते जास्तीचे आकारण्यात येते ते कमी करून देणे म्हणजेच अन्यायाविरुद्ध त्यांची लढत आहे. पुणे जिल्ह्यात नव्हे तर महाराष्ट्रात एक स्त्री म्हणून आपल्या कुशाग्र बुद्धिमत्तेच्या जोरावर पत्रकारिता सामाजिक कार्य महिलांवर होणाऱ्या अन्याय अत्याचाराचे विषय घेऊन लढणाऱ्या एक लढाऊ व्यक्तिमत्व. याचं कार्याची दखल घेऊन त्यांना साहित्यरत्न लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती निमित्त लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जीवन गौरव पुरस्कार हा जाहीर करून त्यांना तो प्रदान करण्यात आला. 

या घेण्यात आलेल्या पुरस्कार सोहळ्याच्या कार्यक्रमास प्रमुख मार्गदर्शिका स्वाती कोकरे, समाज प्रभोधनकार, व्याख्याते, प्रसिध्द सांगली, उद्घाटक डॉ. गुरु बगली श्रीरना ग्रुप ऑफ इन्स्टिट्यूट सांगली स्वागताध्यक्ष विष्णू माने राष्ट्रवादी प्रदेश उपाध्यक्ष महाराष्ट्र राज्य, कार्यक्रमाचे पाहुणे इद्रीस नायकवडी विधानपरिषद, सावंत माजी विधानसभा, विशेष उपस्थिती सुजय नाना शिंदे सभापती मार्केट कमिटी सांगली, संगीता खोत माजी महापौर सांगली, संदीप सूर्यवंशी सहाय्यक पोलीस निरीक्षक, कराड, निवेदक प्रा. घनश्याम चौगुले महात्मा विद्यामंदिर हाय. व ज्यु, कॉलेज, उमदी. निमंत्रक अशोक श्रीपती गोरड, अध्यक्ष, ए.डी. फाऊंडेशन. महादेव महानूर कार्याध्यक्ष, आमदार विक्रम आमदार जत, प्रमुख फाऊंडेशन, समनडी, संयोजन समिती दिलीप वाघमोडे, शरद माने, दादासो गोरड, शेंडगे सागर म्हारनूर आदी मान्यवर, कार्यक्रमाचे आयोजक, सर्व पुरस्कारार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

पुरस्कार्थी जयश्री वी सोनवणे यांनी यांनी प्रसार प्रसार माध्यमांशी बोलताना सांगितलं की हा सन्मान माझा नसून समाजाचा माझ्यावर असणाऱ्या विश्वासाचा आहे. या पुरस्काराने मला आणखीन नवीन जबाबदाऱ्या दिल्या आहेत असं मला वाटतं आणि आणखी कार्य करण्याची प्रेरणा या पुरस्काराने मला मिळाली आहे. हा सन्मान शक्य झाला तो मार्गदर्शक, सहकारी आणि शुभेच्छुक यांच्या प्रेम व विश्वासामुळे. आपल्या सर्वांच्या आशिर्वादाशिवाय हे शक्य नव्हते.
 त्यांना मिळाल्या पुरस्काराबद्दल सोजाई आदिवासी महिला विकास फाऊंडेशनचे अध्यक्ष डॉ. प्रशांत चव्हाण ,उपाध्यक्ष डॉ ओंकार चव्हाण, खजिनदार द्रौपदी सोनवणे, संस्थेचे सदस्य दत्तात्रय चव्हाण, लताताई चव्हाण, संगीता बोरुडे,, दैनिक माझा मराठवाडा चे मुख्य संपादक दशरथ सुरडकर  ,प्रेस संपादक व पत्रकार सेवा संघटनेचे राज्य सरचिटणीस संजीव भांबोरे यांनी त्यांचे अभिनंदन केलेले आहे.

0 Response to "अँड जयश्री सोनवणे सांगली येथे खा.विशाल पाटील यांच्या हस्ते लोकशाहीर साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article