आ.डॉ.प्रणय फुके भारतीय जनता पक्ष जनसंपर्क कार्याला भेट.
मंगलवार, 26 अगस्त 2025
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्त संकलन
या भेटीदरम्यान अनेक नागरिकांनीही भेट घेतली. आपल्या दैनंदिन जीवनाशी निगडीत समस्या, प्रलंबित प्रश्न व शासकीय कामकाजातील अडचणी त्यांनी समोर मांडल्या. नागरिकांकडून प्राप्त झालेली निवेदने स्विकारून त्यांच्या समस्यांवर तातडीने तोडगा निघावा यासाठी संबंधित विभागांना त्वरित कार्यवाही करण्याचे निर्देश दिले.
जनसंपर्क कार्यालय हे कार्यकर्ते आणि नागरिकांसाठी नेहमीच खुले असून पक्षाच्या माध्यमातून होत असलेल्या कामांची माहिती देणे, अडचणींवर मार्ग काढणे व विकासाचा वेग वाढवणे हाच यामागचा उद्देश आहे. भाजपाचे जनसंपर्क कार्यालय म्हणजे पक्ष, कार्यकर्ते आणि नागरिक यांच्यातील मजबूत दुवा असून, या माध्यमातून विकासाची गती अधिक बळकट करण्याचा प्रयत्न सुरू आहे.
0 Response to "आ.डॉ.प्रणय फुके भारतीय जनता पक्ष जनसंपर्क कार्याला भेट."
एक टिप्पणी भेजें