श्रीकांत नागदेवे सांस्कृतिक संघटनेच्या भंडारा जिल्हाध्यक्षपदी निवड.
सोमवार, 18 अगस्त 2025
1 Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज
भंडारा :- लाखनी येथील विश्रामगृहात दि. १८ ऑगस्ट रोजी भारतीय लोक कलाकार सांस्कृतिक संघटनेच्या बैठकीचे आयोजन करण्यात आले होते.या बैठकीत संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष प्रकाशजी काळे यांच्या उपस्थितीत लोककलाकार श्रीकांत नागदिवे यांची जिल्हा अध्यक्षपदी निवड करण्यात आली. श्रीकांत नागदिवे यांच्या सांस्कृतिक आणि सामाजिक क्षेत्रातील उल्लेखनीय कार्याची तसेच कलावंतांच्या न्याय आणि हक्कासाठी केलेल्या प्रयत्नांची विशेष दखल घेऊन त्यांची या पदासाठी निवड करण्यात आली.
निवडीबद्दल कृतज्ञता व्यक्त करताना श्रीकांत नागदिवे यांनी संघटनेचे प्रदेश कार्याध्यक्ष ज्ञानेश्वर पाटील, महाराष्ट्र प्रदेश महिला अध्यक्ष माधुरी घोरमारे, महाराष्ट्र प्रदेश महिला सचिव पल्लवी नगराळे, नागपूर शहर अध्यक्ष सविता गाठकीने, डॉ. महेंद्र मोरे, गणेश भाऊ मेश्राम, चुनीलाल सुतार, सुभाष टेकाम यांच्यासह सर्व सहकाऱ्यांचे आभार मानले. दरम्यान आपल्या निवडीचे श्रेय या सर्वांच्या सहकार्याला आणि प्रेरणेला दिले.
ही नियुक्ती जिल्ह्यातील सांस्कृतिक आणि सामाजिक कार्याला नवी दिशा देणारी ठरेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
Congratulation
जवाब देंहटाएं