श्री चक्रधर स्वामी अवतार दिनानिमित्त सोमवारी भव्य शोभायात्रा.
शनिवार, 23 अगस्त 2025
Comment
• आचार्य लोणारकर बाबा यांचे प्रतिपादन.
"साप्ताहिक जनता की आवाज"
न्यूज नेटवर्क
बुलढाणा :- श्री क्षेत्र जाळीचा देवच्या अखिल भारतीय पंचकृष्ण प्रबोधन परिषदेतर्फे सर्वज्ञ श्रीचक्रधरस्वामी अवतारदिना निमित्त श्रीगोपाल आश्रम, श्रीपंचकृष्ण मंदिर अजिंठा रोड येथे भव्य महोत्सवाचे आयोजन २५ व २६ ऑगस्ट रोजी करण्यात आले असून या महोत्सवात विविध कार्यक्रम होणार आहेत.
राज्यस्तरीय
श्रीमद्भगवतगीता ज्ञानस्पर्धेचे बक्षीस वितरण संपन्न होणार आहे. तसेच २५ ऑगस्ट रोजी चक्रधर स्वामींची भव्य शोभयात्रा बुलढाणा शहरातून काढण्यात येणार असल्याची माहिती पंचकृष्ण प्रबोधन परिषदेचे अध्यक्ष आचार्य श्री लोणारकर बाबा यांनी पत्रकार परिषदे दरम्यान दिली.
२२ ऑगस्ट रोजी गोपाल आश्रम या ठिकाणी पत्रकार परिषदेचे अयोजन करण्यात आले होते. लोणारकर बाबा पुढे म्हणाले की, या महोत्सवात आचार्य मेहकरकर बाबा, पाथरीकर बाबा, आंबेकरबाबा, भीष्माचार्य बाबा, चिचोडीकर बाबा महानुभाव यांचे मार्गदशनपर कार्यक्रम होणार आहे. तसेच २५ ऑगस्ट रोजी सकाळी ८ ते ११ यावेळेत व्यक्तिमत्व विकास युवक मेळावा, श्रीमद्भगवत गीता ज्ञान परिसंवाद
स्पर्धा संपन्न होणार आहे. दुपारी १२ वाजता चक्रधर स्वामी अवतरण सोहळा दुपारी २ ते ६ शहरातून भव्य शोभायात्रा काढण्यात येणार आहे. तर सायंकाळी ७ ते १० या वेळेत कीर्तन, प्रवचन आयोजित करण्यात आले आहे.
२६ ऑगस्ट रोजी सकाळी ५ ते ७ यावेळेत देवपूजा व मंगलस्नान, श्रीमद्भगवत गीता पारायण, सकाळी ८ ते ९ ध्वजारोहण, ९ ते ११ चक्रधर स्वामीच्या तत्वज्ञानावर श्रीमद्भगवत गीता ज्ञान स्पर्धा बक्षिस वितरण सोहळा तर १२ वाजता पंचावतार उपहार व महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले आहे.
शहरातून भव्य शोभायात्रेची सुरवात गोपाल आश्रम अजिंठा रोड येथून होणार आहे. या शोभायात्रेत विविध रथ, देखावे, ढोलताशा पथक, लेझीम पथक यासह धार्मिक व प्रबोधनात्मक साकारण्यात येणार आहे. या दोन दिवसीय महोत्सवामध्ये विविध पक्षाचे खासदार, आमदार, पदाधिकारी तसेच विविध विभागाचे अधिकारी
0 Response to "श्री चक्रधर स्वामी अवतार दिनानिमित्त सोमवारी भव्य शोभायात्रा."
एक टिप्पणी भेजें