-->
चिखपहेला  येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा

चिखपहेला येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा

संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज"
 
भंडारा :- तालुक्यातील पहेला येथून 2 किलोमीटर अंतरावर असलेल्या मौजा चिखलपहेला येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा करण्यात आला. पूर्व विदर्भात नागपूरसह गेल्या कित्येक वर्षापासून तान्हापोळा साजरा करतात. अनेक पालक आपल्या मुलांना वेगवेगळ्या पोशाखामध्ये, लाकडी नंदीबैल सजवून आणतात. तो परिसर तोरण, पताका, फुगे, लावून सजवितात. त्याचप्रमाणे त्या ठिकाणी महादेवाची गाणी म्हटले जाते. मुलांना शेतीत राबणाऱ्या बैलांचे महत्त्व कळावे त्याचप्रमाणे शेतीचे महत्व कळावे व   लहान मुलांचे आनंद द्विगुणित करण्याकरता  दरवर्षी बैल पोळ्याच्या दुसऱ्या दिवशी तान्हा पोळा गावातच मंदिराच्या किंवा सार्वजनिक ठिकाणी हा भरविला जातो .लहान मुले ,मुली,नवीन कपडे घालून व लाकडी नंदीबैल सजवून त्या ठिकाणी येत असतात. त्यानंतर उपस्थित मान्यवरांच्या हस्ते सर्व नंदीबैलांचे पूजन केले जाते. त्यानंतर नंदीबैलाचे परीक्षण करून उत्तम सजावट केलेल्या नंदी बैलांना बक्षीस दिले जाते. त्यात प्रामुख्याने प्रथम- भार्गवी अंकुश नरुले,द्वितीय -अधिरा विकास रोहनकर,, तृतीय- शोषिन मिथुन गजभिये ,चतुर्थ -युक्ती अमरदीप लोणारे, पाचवा -माही भारत शहारे ,सहावा- मंथन मार्तंड शहारे ,सातवा -विहांस रोशन चचाने यांना दामोदर शहारे ,मनीषा चापले ,मुरलीधर शहारे, दिलीप शहारे ,नितेश शहारे, सरिता नरूले ,श्रीधर शहारे, मार्तंड शहारे ,यांच्या प्रमुख उपस्थितीत बक्षीस वितरण विजेत्यांना करण्यात आले ..त्याचप्रमाणे उपस्थित सर्व मुला मुलींना खाऊ, पेन ,पुस्तक ते वाटप  केल्या गेले .  त्यानंतर मुले मुली संबंधितांच्या घरी जाऊन मिळेल ते दान स्वीकारत असतात. अशाप्रकारे तान्हा पोळा उत्सव साजरा केल्या जातो. यावेळी गावातील सर्व महिला भगिनी नागरिक मोठ्या संख्येने एकत्रित येत असतात.

0 Response to "चिखपहेला येथे तान्हा पोळा उत्साहात साजरा"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article