अड्याळ ग्रामतंटामुक्त समिती अध्यक्ष पदी बोदलकर यांची वर्णी
मंगलवार, 26 अगस्त 2025
Comment
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
पवनी :- तालुक्यातील अड्याळ येथे दिनांक 25ऑगस्ट 2025 ला ग्रामपंचायत कार्यालय अड्याळ येथील सभागृहात ग्रामसभा पार पडली.
ग्रामसभेचे अध्यक्ष पद सरपंच शिवशंकरजी मुंगाटे यांनी भूषवले. ग्रामसभेचे कार्यवृत ग्रामविकास अधिकारी कु. पौर्णिमा जे.साखरे यांनी सदर केले. विषय सूची नुसार ग्राम तंटामुक्त समिती अध्यक्षांची निवड करण्यात आली.अध्यक्ष पदाकरीता तीन अर्ज आलेले होते, त्यापैकी मुनीश्वर मोतीरामजी बोदलकर यांना 60 मते मिळाली. मुनीश्वर बोदलकर यांनी यापूर्वी प्रभारी सरपंच, माजी ग्राम तंटामुक्त समिती अध्यक्ष म्हणून तीन वर्ष सेवा दिली होती. सदर ग्रामसभेला पंचायत समिती सदस्या सौ सीमाताई गिरी , उपसरपंच शंकर मानापुरे,ग्रामपंचायत सदस्य देवदासजी नगरे , विपीन टेंभुर्णे, जावेद शेख, आशिक नैतामे, सामाजिक कार्यकर्ते धनंजय मूलकलवार, मयूर कोल्हटकर,विकास टेंभुर्णे,अतुल गभने,अमोल उराडे,राहुल खोब्रागडे, कमलेश जाधव,पंकज वानखेडे , सर्व ग्राम पंचायत सदस्या,सर्व आशा तथा अंगणवाडी सेविका, , कर्मचारी वृंद, सर्व ग्रामसभा सदस्य यांनी नवनिर्वाचीत अध्यक्षांचे पुष्पहार, पुष्पगुच्छ देऊन अभिनंदन केले. सभेचे अध्यक्ष सरपंच शिवशंकरजी मुंगाटे यांनी ग्रामसभेत सर्व उपास्थित ग्रामस्थांचे आभार मानले.
0 Response to "अड्याळ ग्रामतंटामुक्त समिती अध्यक्ष पदी बोदलकर यांची वर्णी"
एक टिप्पणी भेजें