भंडारा पोलिसांची जुलै/ 2025 ची गुन्हे आढावा बैठक साकोली संपन्न
मंगलवार, 19 अगस्त 2025
Comment
संजीव भांबोरे
"सापताहीक जनता की आवाज"
भंडारा :- जिल्हा पोलिसांकडे तपासातील प्रलंबित गुन्ह्यांचा तसेच येणारे सण उत्सव, संभाव्य कायदा व सुव्यवस्था आढावा घेऊन त्याकरिता बंदोबस्ताची आखणी करण्याकरता जिल्हा पोलिसांकडून दर महिन्याला गुन्हे विषयक बैठक आयोजित करण्यात येत असते .या बैठकीचा उद्देश जिल्ह्यातील सर्व वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची सामूहिक बैठक घेऊन त्यांच्याकडील प्रलंबित गुन्ह्याचा आढावा घेणे तसेच त्यांचे उपविभाग पोलीस स्टेशन कार्यक्षेत्रात असलेला कायदा व सुव्यवस्थेची माहिती वरिष्ठांना पुरवून त्यांच्याकडून मार्गदर्शन प्राप्त करणे हा आहे.
जिल्हा पोलिसांची गुन्हे आढावा बैठक ही नेहमी जिल्हा मुख्यालयाच्या ठिकाणी आयोजित केली जाते .परंतु भंडारा जिल्हा पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक पदाचा कार्यभार स्वीकारल्यापासून त्यांनी त्यांच्या अभिनय संकल्पनेतून भंडारा जिल्हा पोलिसांची मासिक गुन्हे विषयक आढावा बैठक जिल्हा मुख्याध्याबाहेर घेण्यात येत असून यापूर्वीच्या मासिक गुन्हे विषयी आढावा बैठकी गोबरवाही ,अड्याळ,करडी, तुमसर ,लाखांदूर येथे घेण्यात आल्या होत्या .तीच परंपरा कायम ठेवत माये जुलै /2025 ची भंडारा जिल्हा पोलीस दलाची मासिक गुन्हे विषयी आढावा बैठक आज दिनांक 18 ऑगस्ट 2025 रोजी साकोली येथील हॉटेल मोदी इन येथे घेण्यात आली.
या गुन्हे बैठकीला जिल्हा पोलीस अधीक्षक नुरुल हसन अप्पर पोलीस अधीक्षक निलेश मोरे तसेच जिल्ह्यातील सर्व उपविभागीय पोलीस अधिकारी ,सर्व पोलीस ठाणे प्रभारी, अधिकारी आणि सर्व शाखाप्रमुख उपस्थित होते. जिल्हा पोलीस दलातील अधिकारी अंमलदारांपैकी एप्रिल /2025 मध्ये उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या 13 पोलीस अधिकारी ,अमलदार ,मंत्रालयीन कर्मचारी, यांना तसेच उपजिल्हा रुग्णालय साकोली येथील वैद्यकीय अधीक्षक डॉ. संदीप गजभिये आणि जे एम एफ सी कोर्ट साकोली येथील सहायक सरकारी अभियोक्ता तौसिफ हुसेन खान यांचा त्यांनी केलेल्या उत्कृष्ट कार्याबद्दल पोलीस अधीक्षक नुरुल हसन यांचे हस्ते प्रशस्तीपत्र व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला. बैठकीमध्ये जिल्हा पोलीस अधीक्षकांकडून प्रलंबित गुन्ह्यांची माहिती घेऊन तपासा संबंधाने मार्गदर्शन करण्यात आले .तसेच येणाऱ्या काळातील बैलपोळा ,गणेशोत्सव ,आणि ईद-ए-मिलाद या धार्मिक उत्सवात संबंधाने पोलीस स्टेशन मधील पूर्वीच्या घटनांचा आढावा घेऊन बंदोबस्ता संबंधाने सूचना देऊन जिल्ह्यात लपून छपून सुरू असलेले सर्व प्रकारच्या अवैध धंद्यांवर कायदेशीर कारवाई करण्याबाबत पोलिस अधीक्षक नुरूल हसन यांनी जिल्ह्यातील सर्व पोलीस ठाणे प्रमुखांना आदेश दिले.
मासिक गुन्हे विषयक आढावा बैठकीनंतर जिल्हा पोलीस अधीक्षक नुरूल हसन यांनी साकोली पोलीस स्टेशन अंतर्गत असलेल्या पोलीस दूरकेंद्र सानगडी येथे भेट देऊन सानगडी परिसरातील नागरिक तसेच पोलीस पाटील यांच्याशी प्रत्यक्ष संवाद साधून त्यांच्या अडीअडचणी जाणून पोलीस दलाची निगडित समस्यांचे समाधान करण्याची आश्वासन दिले.
0 Response to " भंडारा पोलिसांची जुलै/ 2025 ची गुन्हे आढावा बैठक साकोली संपन्न "
एक टिप्पणी भेजें