बलात्कार प्रकरणात कठोर कारवाई करा- अकोला जिल्हाधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना निवेदन
शुक्रवार, 12 सितंबर 2025
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
अकोला :- ०६ सप्टेंबर २०२५ रोजी अकोला शहरात गणपती विसर्जन दिवशी एका गरीब कुटुंबातील १६ वर्षीय अल्पवयीन मुलीवर बलात्कार आणि छेडछाडीची गंभीर घटना उघडकीस आली आहे.या घृणास्पद कृत्याविरुद्ध अकोला जिल्ह्यातील सकल हिंदू समाजाच्या वतीने जन आक्रोश मोर्चा काढण्यात आला. यात सम्राट अशोक सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी सुद्धा सहभाग घेऊन आरोपीला फाशी झाली पाहिजे अशा मागणीचे निवेदन 12 सप्टेंबर 2025 ला जिल्हाधिकारी मार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना देण्यात आले, निवेदन देताना सम्राट अशोक सेनेचे आकाश दादा शिरसाट शेखर पोटदुखे , केल्विन सब, सिद्धू मेश्राम, सौरभ निळकंठ, नक्षल तेलगोटे ,निखिल शिरसाट, रितू शिरसाट ,अंकित तायडे व इतर कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. या मोर्चात भीम नगर मधील सर्व भीमसैनिक व सकल हिंदू जनआक्रोश मोर्चात सहभाग झाले होते.
या अमानुष घटनेचा सर्वांनी तीव्र निषेध करून गुन्हेगाराला,मग तो कोणत्याही समुदायाचा असो,या गुन्हेगाराला फाशीची शिक्षा मिळाली पाहिजे. असे आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्री यांना पाठविलेल्या निवेदनातून म्हटले आहे.
0 Response to "बलात्कार प्रकरणात कठोर कारवाई करा- अकोला जिल्हाधिकारी यांच्यामार्फत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांना निवेदन"
एक टिप्पणी भेजें