क्रांतीसूर्य व क्रांतीज्योती शिक्षक प्रेरणा पुरस्कारानिमित्त उद्घाटक म्हणून मा.छगनरावजी भुजबळ (अन्न व नागरी पुरवठा मंञी,महाराष्ट राज्य) उपस्थित राहणार.
गुरुवार, 11 सितंबर 2025
Comment
प्रमुख पाहुणे दै.पुण्यनगरीचे संपादक मा.किरण लोखंडे, मा.दत्ताञय कराळे(आय.जी,नाशिक परिक्षेञ )
• तर डाॅ.संजीव सोनवणे(कुलगुरु- यशवंतराव चव्हाण महाराष्ट मुक्त विद्यापीठ,नाशिक)उपस्थित राहणार आहे.
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्त प्रतिनिधी.
नाशिक :- पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेतर्फे राज्यस्तरीय क्रांतीसूर्य व क्रांतीज्योती शिक्षक प्रेरणा पुरस्कार रविवार दि. 28 सप्टेंबर 2025 रोजी नाशिक येथे परशुराम सायखेडकर सभागृह,शालीमार येथे सकाळी 10 वा. आयोजन केले असून कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून मा.छगनरावजी भुजबळ(अन्न व नागरी पुरवठा मंञी,महाराष्ट राज्य)व कार्यक्रमाध्यक्ष मा.नितीनजी ठाकरे (सरचिटणीस,म.वि.प्र.स,नाशिक)तर प्रमुख पाहुणे म्हणून दै.पुण्यनगरी चे संपादक मा.किरण लोखंडे व मा.दत्ताञय कराळे(आय.जी,नाशिक परिक्षेञ) व डाॅ.संजीव सोनवणे(कुलगुरु-यशवंतराव चव्हाण महाराष्ट मुक्त विद्यापीठ नाशिक) हे सर्व मान्यवर उपस्थित राहणार आहे.
संपूर्ण महाराष्टातील शैक्षणिक क्षेञात दैदिप्यमान कार्य करणार्या 105 निवडक शिक्षकांना सन्मानित करण्यात येणार असून,त्यात काही निवडक संस्थाचालक,मुख्याध्यापकांचा सन्मान करण्यात येणार आहे. अशी माहिती पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष व आहिरे स्पर्धा परीक्षा ॲकॅडमीचे संचालक प्रा.डॉ. आनंद आहिरे यांनी दिली.
पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सन 2016पासून आजतागायत साहित्यक्षेञात 51 च्या वरती विनामूल्य राज्य,राष्टीय व आंतरराष्टीय कवीसंमेलन,साहित्यसंमेलन,पुरस्कार सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहेत.तर शैक्षणिक क्षेञात आहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या माध्यमातून सोळा हजारच्या वरती विद्यार्थी शिकून गेले आहेत.त्यात 1617 विद्यार्थी स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण झाले आहेत. संपुर्ण महाराष्टातील 96000च्या वरती विद्यार्थ्यांना विनामूल्य स्पर्धा परीक्षाचे मार्गदर्शन करण्यात आले आहे.गुणवंत व उत्तीर्ण विद्यार्थी सन्मान सोहळा साजरा केला जातो. तर सामाजिक क्षेञात दरवर्षी जागतिक महिला दिन व मातृदिन सन्मान सोहळा साजरा केला जातो.अनाथ आश्रम,वृध्दाश्रम व वस्तीगृहास विविध विविध प्रकारे मदत केली जाते.
या कार्यक्रमात आहिरे अकॅडमी व बीग स्कोर एज्युकेशन कंपनी या दोघांचे (Air Rankar Learning online App) चे उद्घाटन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते होणार आहे.व याच दिवशी आमची संस्था-पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्था दै.पुण्यनगरीची पुरवणीचे प्रकाशन होणार आहे. तर प्रा.डाॅ.आनंद आहिरे यांचे स्वकथन प्राध्यापकांना घडविणारा प्राध्यापक या पुस्तकाचे प्रकाशन होणार आहे.
सर्वांनी कार्यक्रमास यावे.अशी विनंती पुष्परत्न बहुउद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष व आहिरे स्पर्धा परीक्षा अकॅडमीचे संचालक प्रा.डाॅ.आनंद आहिरे यांनी केली.
0 Response to "क्रांतीसूर्य व क्रांतीज्योती शिक्षक प्रेरणा पुरस्कारानिमित्त उद्घाटक म्हणून मा.छगनरावजी भुजबळ (अन्न व नागरी पुरवठा मंञी,महाराष्ट राज्य) उपस्थित राहणार. "
एक टिप्पणी भेजें