आजपासून जीएसटी दरात बदल; २२,सप्टेंबर २०२५ कोणत्या वस्तू स्वस्त, कोणत्या महाग ? जाणून घ्या.
सोमवार, 22 सितंबर 2025
 Comment 
"साप्ताहिक जनता की आवाज"
नेटवर्क न्यूज 
 न्यू दिल्ली :- आज आजपासूनपासून जीएसटी बदल २२ सप्टेंबर २०२५  लागू नवे GST दर काय होणार महाग, काय होणार स्वस्त?
केद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी जाहीर केल्यानुसार, आजपासून वस्तू आणि सेवा कराच्या (GST) दरात मोठे बदल झाले आहेत. या निर्णयामुळे आता १२% आणि २८% चे जीएसटी स्लॅब रद्द करण्यात आले असून, केवळ ५% आणि १८% हे दोन स्लॅब शिल्लक राहिले आहेत. यामुळे सर्वसामान्यांच्या दैनंदिन जीवनातील अनेक वस्तू स्वस्त झाल्या आहेत तर चैनीच्या आणि आरोग्याला हानिकारक वस्तू महाग झाल्या आहेत.
रोजगार सेतु :- तुमच्या करिअरसाठी नवी संधी
आजपासून लागू नवे GST दर काय होणार महाग, काय होणार स्वस्त?
कोणत्या वस्तूंवर 0% GST लागणार :
कोणत्या वस्तूंवर ५% GST लागणार :
कोणत्या वस्तूंवर १८% GST लागणार :
तज्ज्ञांचे मत:
या बदलांमुळे अनेक महत्त्वाच्या वस्तूंवरील कर कमी झाला आहे. आता काही वस्तूंवर कोणताही कर लागणार नाही, तर काही वस्तूंवर ५% किंवा १८% जीएसटी लागेल.
• शून्य टक्के जीएसटी :- प्रक्रिया केलेले दूध, पनीर, पिझ्झा ब्रेड, तयार चपात्या, तसेच पेन्सिल, वह्या, आणि ३३ जीवनरक्षक औषधे यांसारख्या वस्तूंवर आता कोणताही कर लागणार नाही.
• ५ टक्के जीएसटी:- वनस्पती तेल, तूप, साखर, बिस्किटे, चॉकलेट, पास्ता, ज्यूस, शाम्पू, साबण, टुथपेस्ट, घरातील भांडी आणि कपडे शिवण्याची मशीन यांसारख्या वस्तू स्वस्त झाल्या आहेत. याशिवाय ट्रॅक्टर आणि शेतीची उपकरणे, थर्मामीटर आणि वैद्यकीय ग्लुकोमीटर यांसारख्या वस्तूंचाही यात समावेश आहे.
• १८ टक्के जीएसटी:- एसी, वॉशिंग मशीन, टीव्ही, मॉनिटर, प्रोजेक्टर, छोट्या कार, तीन चाकी वाहने, ३५० सीसी पेक्षा कमी इंजिन क्षमता असलेल्या दुचाकी आणि रुग्णवाहिका यांसारख्या वस्तूंवरील कर कमी झाल्यामुळे त्या स्वस्त झाल्या आहेत.
या बदलामुळे चैनीच्या आणि आरोग्यास हानिकारक असलेल्या वस्तूंवरील कर वाढवण्यात आला आहे. या वस्तूंवरील जीएसटी 28% वरून थेट 40% इतका करण्यात आला आहे.
• वाहने :- ३५० सीसी पेक्षा जास्त इंजिन क्षमता असलेल्या दुचाकी, मोठ्या एसयुव्ही गाड्या आणि अलिशान कार आता अधिक महाग झाल्या आहेत.
 मनोरंजन आणि व्यसन : कॅसिनो, रेस क्लब आणि सट्टेबाजी यांसारख्या सेवांवर आता जास्त जीएसटी लागेल. तसेच सिगार, सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थ आणि कार्बनयुक्त पेये देखील महाग झाली आहेत.
GST Rate Change २०२५ :- आतापर्यंत १८℅ आणि २८% GST स्लॅबमध्ये असणाऱ्या वस्तूंवरील कर कमी झाला होता. या वस्तू ५ व १८% स्लॅबमध्ये आल्या होत्या. तर आतापर्यंत ५% GST असलेल्या अनेक वस्तू कर मुक्त झाल्या होत्या.
हेही वाचा : – नवरात्र २०२५ नवरात्रीच्या नऊ रंगांचा नेमका अर्थ काय ? जाणून घ्या पौराणिक मान्यता आणि महत्त्व…
कोणत्या वस्तूंवर 0% GST लागणार :
खाद्यपदार्थ :- दूध, पनीर, पिझ्झा, ब्रेड, रेडी टू इट चपाती, पराठा
शैक्षणिक साहित्य :- पेन्सिल, वही, चार्ट, प्रयोगशाळेतील वह्या
आरोग्य क्षेत्र :- ३३ जीवनरक्षक औषधे, आरोग्य विमा, जीवन विमा
कोणत्या वस्तूंवर ५% GST लागणार :
खाद्यपदार्थ :- वनस्पती तेल, बटर, तूप, साखर, मिठाई, पास्ता, बिस्कीट, चॉकलेट, ज्यूस, नारळपाणी
दैनंदिन वस्तू :- शाम्पू, तेल, टुथपेस्ट, साबण, शेव्हिंग क्रीम
घरगुती वस्तू :- किचनमधील वस्तू, लहान मुलांची दुधाची बाटली, छत्री,मेणबत्ती,शिलाई मशीन, नॅपकिन, डायपर्स, हँडबॅग, फर्निचर
कृषी साहित्य :- ट्रॅक्टर, कृषी उपकरणे, सिंचन साहित्य, ठिंबक सिंचन साहित्य, पंप
वैद्यकीय वस्तू :- थर्मामीटर, ग्लुकोमीटर, मेडिकल ग्रेड ऑक्सिजन, चष्मा, रबर, हातमोजे
नक्षीकाम केलेल्या वस्तू :- हाताने तयार केलेले कागद, पेटिंग्ज, वीटा, टाईल्स
कोणत्या वस्तूंवर १८% GST लागणार: -
इलेक्ट्रॉनिक वस्तू वातानुकूलित यंत्र (AC), वॉशिंग मशीन,LED टीव्ही, मॉनिटर, प्रोजेक्टर
वाहने: - लहान कार, तीनचाकी वाहने, रुग्णवाहिका, ३५० सीसीपेक्षा कमी क्षमतेच्या दुचाकी, व्यापारी वाहने
सेवा क्षेत्र :- हॉटेल (दिवसाला ७५०० पेक्षा कमी असणारी), चित्रपटगृह (१००रू पेक्षा कमी तिकीट असणारी), ब्युटीपार्लर
GST मुळे कोणत्या वस्तू महाग झाल्या :- चैनीच्या वस्तू आणि आरोग्यास हानिकारक असलेल्या वस्तू
कॅसिनो, रेस क्लब, जुगार, सट्टेबाजी (या सगळ्यावरील कर २८% वरुन ४०% इतका वाढवण्यात आला)
हानिकारक उत्पादने :- सिगार, सिगारेट, तंबाखूजन्य पदार्थ, कॉर्बोनेटेड आणि कॅफिनयु्क्त पेयं (कर २८% वरुन ४०%) इतका वाढवला आहे.
कोणी टाळाटाळ केल्यास ‘इथे’ करा तक्रार!
तक्रार कुठे कराल?
सरकारने राष्ट्रीय ग्राहक हेल्पलाइन (NCH) सुरू केली आहे:- consumerhelpline.gov.in (InGram Portal)
टोल-फ्री: १९१५
NCH App / UMANG App
WhatsApp, SMS, Email
GST Rate Change 2025 : १७ भारतीय भाषांमध्ये उपलब्ध सेवा!
तक्रार दाखल होताच तुम्हाला युनिक डॉकेट नंबर मिळेल, ज्याद्वारे कारवाईची माहिती मिळेल.
बचत तपासा!
savingwithgst.in या पोर्टलवर
तुम्ही GST लागू होण्यापूर्वी व नंतरच्या किंमती पाहू शकता.
अन्नपदार्थ , घरगुती वस्तू इलेक्ट्रॉनिक्स इत्यादी श्रेणींमध्ये तुमची बचत किती झाली ते कळेल.
तज्ज्ञांचे मत:
GST Rate Change २०२५ :- या नव्या तक्रार प्रणालीमुळे ग्राहकांना दरकपातीचा खरा फायदा मिळतो आहे का, हे तपासता येईल आणि सुधारणा अधिक प्रभावी ठरतील.
0 Response to "आजपासून जीएसटी दरात बदल; २२,सप्टेंबर २०२५ कोणत्या वस्तू स्वस्त, कोणत्या महाग ? जाणून घ्या."
एक टिप्पणी भेजें