सभापतींची कर्मचाऱ्यांना अश्लिल शिवीगाळ .
सोमवार, 22 सितंबर 2025
Comment
साकोली पंचायत समितीतील प्रकार ; अधिकारी कर्मचारींतर्फे तीव्र निषेध व लेखणी बंद •
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- मासिक सभा संपल्यावर पंचायत समिती सभापतींनी अधिकारी व कर्मचाऱ्यांना अवांतर भाषेत अश्लिल शिवीगाळ करीत शासकीय कर्मचारींची मानहानी केली. त्यांनी सर्वांची जाहीर माफी मागावी. जोपर्यंत माफी मागत नाही तोपर्यंत लेखणी बंद आंदोलन सुरू ठेवण्याचा निर्णय घेत ( सोम. २२ सप्टें.) ला खंड विकास अधिकारी व आमदार नाना पटोले यांना निवेदन देण्यात आले. याप्रकरणी साकोलीत चांगलेच वातावरण तापलेले आहे.
शुक्रवार १९ सप्टेंबरला पंचायत समितीत मासिक सभा संपल्यावर सभापती ललित शंकर हेमने यांनी पं. स. मधील सर्व अधिकारी व कर्मचारी यांना अवांतर भाषेत अश्लील शिवीगाळ करीत "सर्व अधिकारी कर्मचारी ( अश्लिल शब्द ) आहेत, चोर आहेत. पैसे घेतल्याशिवाय कोणतेही काम करीत नाहीत, कोणीही दुधाने धुतलेले नाहीत. दारुसाठी मागेमागे येतात" अशा प्रकारच्या अशोभनिय भाषेत स्वत:चे कक्षात व कक्षाबाहेर कार्यालयाचे व्हरांड्यात मोठमोठया आवाजात ओरडून बोलत अश्लील व अशोभनिय भाषेत शिवीगाळ केली. याशिवाय कार्यालयातील महिला अधिकारी कर्मचारी उपस्थित असतांना सुध्दा अश्लील भाषेत शिवीगाळ केली. ही बाब कार्यालयीन दृष्टीने अत्यंत अशोभनिय आहे व अधिकारी कर्मचारी-यांचे आत्मसन्मान खच्चीकरण करणारी आहे. सदर प्रकरणामुळे अधिकारी कर्मचा-यांमध्ये असंतोष निर्माण झालेला आहे.
सदर घडलेल्या घटनेचा आम्ही सर्व अधिकारी व कर्मचारी तीव्र निषेध करुन सभापती पं. स. साकोली हे जोपर्यंत घडलेल्या प्रकारावर पंचायत समिती साकोली कार्यालयातील अधिकारी व कर्मचारी यांची जाहीर माफी मागत नाही तो पर्यंत दि. २२ सप्टेंबर पासून आम्ही खालील सही करणारे अधिकारी व कर्मचारी, ग्रामपंचायत अधिकारी यांनी "लेखनी बंद" करण्याचा निर्णय घेतलेला आहे. असे निवेदन आमदार नाना पटोले, मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. भंडारा यांना सुद्धा देण्यात आले. या प्रसंगी पंचायत समिती मधील सर्व कर्मचारी व अधिकारी तसेच सर्व ग्रामपंचायत अधिकारी प्रामुख्याने उपास्ति होते. व ग्रामपंचायत अधिकारी संघटनांनी सुद्धा निवेदन दिले.
या संतापजनक प्रकारामुळे जिल्हा परिषद, पंचायत समितीतील वातावरण तापले असून एक पदस्थ सभापतींना अधिकारी व कर्मचाऱ्यांना अश्लिल शिवीगाळ ही भाषा शोभून दिसते का.? या प्रकाराने सर्व जनतेसमोर आमचा अपमान झाला यावर तातडीने दखल घेतली नाही तर लेखणी बंद आंदोलन सुरू राहील अशी प्रतिक्रिया साकोली पंचायत समितीच्या आवारात सुरू होती. सदर निवेदनात गटविकास अधिकारी पी. व्ही. जाधव, सहा. गटविकास अधिकारी प्रदीप समरीत, गटशिक्षणाधिकारी विजय आदमने यांसह अनेक अधिकारी व कर्मचाऱ्यांच्या स्वाक्षऱ्या आहेत.
0 Response to "सभापतींची कर्मचाऱ्यांना अश्लिल शिवीगाळ ."
एक टिप्पणी भेजें