-->
लाखनी तालुक्यात साजरा केला पालकमंत्री दरबार...... जनतेने घेतला उत्साहाने भाग- सात तक्रारी प्राप्त.

लाखनी तालुक्यात साजरा केला पालकमंत्री दरबार...... जनतेने घेतला उत्साहाने भाग- सात तक्रारी प्राप्त.

नरेंद्र मेश्राम 
"सापताहीक जनता की आवाज" 

लाखनी :- जनता पालकमंत्री जनता दरबाराचा मुख्य उददेश जनता दरबाराचा प्राथमिक उददेश हा शासन आणि जनता यांच्यातील दरी कमी करणे हा आहे. अनेकदा सामान्य नागरीकांना शासकीय कार्यालयामध्ये आपल्या कामांसाठी किंवा तक्रारीसाठी अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. अशा परीस्थीत, जनता दरबार त्यांना सोपा आणि थेट मार्ग उपलब्ध करुन देतो. त्यांचे काही प्रमुख उददेश खालीलप्रमाणे आहेत.

1. थेट संवादः- अनेक प्रकरणांमध्ये उपस्थित अधिका-यांना जागेवरच समस्येचे निराकरण करण्याचे आदेश दिले जातात ज्यामुळे वेळेची बचत होते.

2. पारदर्शकता आणि उत्तरदायित्वः- या उपक्रमामुळे प्रशासनात पारदर्शकता वाढते. आणि अधिकारी अधिक जबाबदारीने काम करतात.

3. शासकीय योजनांची माहिती: नागरीकांना विविध शासकीय योजनांची माहिती मिळते आणि त्या योजनांचा लाभ घेण्यासाठी येणा-या अडचणींवर चर्चा करता येते.

या सर्व बाबी लक्षात घेऊनच मा. पालकमंत्री महोदय भंडारा यांच्या आदेशान्वये भंडारा जिल्हयातील प्रत्येक सोमवारी तहसील कार्यालय येथे जनता दरबाराचे आयोजन करण्याचे निर्देश या कार्यालयास प्राप्त झाले आहेत.

त्यानुसार आज सोमवार दि. 08.09.2025 रोजी तहसील कार्यालय लाखनी येथे जनता दरबाराचे आयोजन तहसीलदार लाखनी यांचे अध्यक्षतेखाली करण्यात आले. सदर दरबारात विविध कार्यालयाचे कार्यालय प्रमुख, कर्मचारी तसेच बहुसंख्येने नागरीक उपस्थित होते. कार्यक्रमात उपस्थितांना तहसीलदार लाखनी यांनी मार्गदर्शन केले. तसेच उपस्थितांचे प्रश्न ऐकून घेतले. त्यांनुसार त्यांचेकडून अर्ज प्राप्त करुन घेतले. व जलद गतीने निकाली काढण्याबाबत संबंधितांना सूचना दिल्या.

जनता दरबारात, तहसीलदार लाखनी श्री. धनंजय देशमुख, सहाय्यक गटविकास अधिकारी श्री. धारगावे, अधिक्षक श्री. देव्हारे, तालुका आरोग्य अधिकारी लाखनी येथील कर्मचारी, तालुका कृषी अधिकारी लाखनी यांचे कार्यालयातील कर्मचारी, सांख्यिकी कार्यालय लाखनी, पाटबंधारे उपविभाग साकोली येथील श्रीमती प्रियंका चिचाळकर तसेच तहसील कार्यालय लाखनी येथील नायब तहसीलदार श्री. ऊरकुडकर, निरीक्षण अधिकारी

पुरवठा विभाग श्री. रोशन कापसे व समस्त कर्मचारी वृंद उपस्थित होते. पत्रकार व जनप्रतिनिधीही यावेळी उपस्थित होते.

यामध्ये आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत 12 शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये मोफत औषधोपचार करण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन करण्यात आले.
यामध्ये आयुष्यमान भारत योजनेअंतर्गत 12 शासकीय व खाजगी रुग्णालयांमध्ये मोफत औषधोपचार करण्यासाठी प्रोत्साहित करावे, असे आवाहन करण्यात आले.

लक्ष्मी मुक्ती योजना कशा प्रकारे यशस्वी होऊ शकते याबाबत तहसीलदार श्री. धनंजय देशमुख यांनी माहिती दिली. तसेच पुरवठा विभागातील श्री रोशन कापसे यांनी दिव्यांगाकरीता घरपोच धान्य पोचविण्याची योजना कशा प्रकार यशस्वी केली याबाबत माहिती दिली.

सदर जनता दरबारात एकूण 7 अर्ज प्राप्त झाले. त्यापैकी 3 अर्ज गट विकास अधिकारी यांचे कार्यालयाशी संबंधित असल्यामुळे त्यांचेकडे वर्ग करण्यात आले. व उर्वरीत 4 प्रकरणे या कार्यालयात तात्काळ निकाली काढण्याची कार्यवाही सुरु करण्यात आली आहे.

0 Response to "लाखनी तालुक्यात साजरा केला पालकमंत्री दरबार...... जनतेने घेतला उत्साहाने भाग- सात तक्रारी प्राप्त."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article