जनता दरबारात मांडल्या बिडी कामगारांच्या व्यथा.
सोमवार, 8 सितंबर 2025
Comment
नरेंद्र मेश्राम
"सापताहीक जनता की आवाज"
तुमसर/खापा : - 8/9/2025 गेल्या कीत्तेक वर्षापासुन शासनाच्या योजने अंतर्गत बिड्या बांधुन आपले आयुष्य झिजवले, परंतु शासनाने या बिडी कामगाराकडे जणू काही दुर्लक्षच केल्याचे दिसुन येते, आज पर्यंत बिडी कामगरच्या व्यथा कुणीच एैकुण घेतल्या नाही, परंतु दिव्याग संघटनेचे तुमसर तालुका प्रमुख श्री शेषराव गणविर यांनी बिडी कामगाराच्या व्यथा ऐकून त्यांच्यासाठी लढा द्यायचा असा निर्धार केला व बिडी कामगारांना घेऊन सरळ तहसिल कार्यालय तुमसर येथील जनता दरबारात आपल्या मागण्या रेटून धरल्या व मा. तहसिलदार यांच्या माध्यमातुन मा. मुख्यमंत्री साहेब महाराष्ट्र राज्य यांना निवेदन सादर केला.
बिडी कामगारांशी प्रत्यक्ष चर्चा केली असता त्यांनी आपल्या व्यथा प्रसार माध्यमा समोर व्यक्त केल्या त्यांनी सांगीतले की आम्ही अनेक वर्षापासुन बिड्या बांधतो बिड्या बांधता-बांधता आमचे अख्खे आयुष्य निघुन गेले परंतु आजही आम्हाला तुटपुज्या पेन्शन वर आपला उदर निर्वाह कसाबसा चालवत आहोत असे सांगीतले.
गणविर यांनी सांगीतले की, शासनाने लवकरात लवकर बिडी कामगारांची पेन्शन वाढवुन ६०००/- करावी अन्यथा मोठ आंदोलन उभारण्यात येईल, तसेच आमरण उपोषन करण्याचीही तयारी त्यांनी दर्शविली.
याप्रसंगी दिव्यांग संघटनेचे तुमसर तालुका प्रमुख शेषराव गणविर तसेच तुमसर तालुक्यातील महिला बिडी कामगार यांनी उपस्थीती दर्शविली.
0 Response to "जनता दरबारात मांडल्या बिडी कामगारांच्या व्यथा."
एक टिप्पणी भेजें