सोजाई आदिवासी महिला विकास फाउंडेशनच्या वतीने महिलांसाठी दिघी पुणे येथे दहा दिवस मोफत दांडिया(गरबा) कार्यशाळेचे आयोजन
शुक्रवार, 12 सितंबर 2025
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
पुणे :- नवरात्री हा स्त्रीशक्तीचा आणि दैवी स्त्रीतत्त्वाचा सन्मान करण्याचा सण आहे.स्त्री ही केवळ अबला नसून सबला आहे हे अधोरेखित करतात. नवरात्री स्त्रीत्वाचा गौरव करून जीवनातील ऊर्जा आणि उत्साहाला जागृत करते. शक्तीचा जागर करायचा असेल, तर तिचे मनोबल, आत्मबल वाढवले पाहिजे. तिला स्वतःबद्दलच्या कायद्याची, अधिकारांची माहिती करून दिली पाहिजे. तरच खर्या अर्थाने स्त्री शक्तीचा जागर होईल.
आणि म्हणूनचं अशा स्त्री शक्तीला, थोडासा विरंगुळा आणि त्यांच्या कलागुणांना वाव आणि कायद्याची माहिती मिळावी म्हणून "सोसाई आदिवासी महिला विकास फाउंडेशनच्या" वतीने दहा दिवस दिघी पुणे येथे मोफत गरबा (दांडिया) कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यशाळेला महिलांनी उत्स्फूर्त असा प्रतिसाद देत आपली नाव नोंदणी केली असून पहिल्याच दिवशी चाळीस महिलांनी या कार्यशाळेत आपला सहभाग नोंदवला होता.
यावेळी सोजाई आदिवासी महिला विकास फॉउंडेशन अध्यक्ष डॉ. प्रशांत चव्हाण यांनी महिलांना मार्गदर्शन करताना म्हंटले की गरबा हा केवळ एक सणसुदीचा खेळ नसून तो एक उत्तम व्यायाम प्रकार आहे. यातून शारीरिक आणि मानसिक आरोग्य दोन्ही सुधारते, ज्यामुळे व्यक्तीला निरोगी आणि आनंदी राहण्यास मदत होते.म्हणून आम्ही या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
यावेळी सोजाई आदिवासी महिला विकास फाउंडेशनच्या सचिव अँड.जयश्री सोनवणे यांनी महिलांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की,नवरात्रीच्या निमित्ताने एकच सांगावस वाटत की स्त्रीला देण्यासाठी सर्वात मोलाची भेट म्हणजे तिचा सन्मान, आणि हा सन्मान जर प्रत्येक स्तरातील स्त्रीला दिला गेला तर तिचे मानवी हक्क तिला अनुभवता येईल अशी समाजव्यवस्था निर्माण होईल आणि हाच खरा स्रीशक्तीचा जागर असेल.
स्त्री ही सृष्टीची शक्ती मानली जाते, म्हणजेच मानव जातीचे अस्तित्व स्त्रीपासून आहे असे मानले जाते. महिला सक्षमीकरणाचा अर्थ या निर्मितीच्या शक्तीचा विकास आणि परिष्कृत करणे आणि तिला सामाजिक, आर्थिक, राजकीय न्याय, विचार स्वातंत्र्य, श्रद्धा, धर्म आणि उपासना, संधीची समानता प्रदान करणे आहे. दुसर्या शब्दांत महिला सक्षमीकरण म्हणजे महिलांची सामाजिक आणि आर्थिक स्थिती सुधारणे. जेणेकरून त्यांना रोजगार, शिक्षण, आर्थिक प्रगतीच्या समान संधी मिळतील, जेणेकरून त्यांना सामाजिक स्वातंत्र्य आणि प्रगती मिळेल. हाच मार्ग आहे ज्याद्वारे स्त्रिया पुरुषांप्रमाणेच त्यांच्या प्रत्येक आकांक्षा पूर्ण करू शकतात.
सोप्या शब्दात महिला सक्षमीकरणाची व्याख्या अशा प्रकारे केली जाऊ शकते की यामुळे महिलांमध्ये ती शक्ती येते, ज्यातून ती तिच्या जीवनाशी संबंधित प्रत्येक निर्णय स्वतः घेऊ शकते आणि कुटुंब आणि समाजात चांगले जगू शकते. महिला सक्षमीकरण म्हणजे त्यांना समाजात त्यांचे खरे अधिकार मिळवून देणे होय. त्यासाठी सर्वांनी मिळून प्रयत्न करणे गरजेचे आहे. या प्रयत्नांची सुरवात करण्यासाठी, स्त्रियानीं एकत्र येण्यासाठी असे उपक्रम घेणे गरजेचे आहे.म्हणून आम्ही या मोफत कार्यशाळेचे आयोजन केले आहे.
या गरबा (दांडिया)मोफत कार्यशाळेसाठी प्रशिक्षक शुभम डान्स अकॅडमीचे शुभम सर व रॉयल डान्स अकॅडमीच्या माधुरी जायभाय मॅडम यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. तसेच सोजाई आदिवासी महिला विकास फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ. प्रशांत चव्हाण, उपाध्यक्ष डॉ. ओंकार चव्हाण,सचिव अँड जयश्री सोनवणे, दत्तात्रेय चव्हाण,लताबाई चव्हाण, द्रोपती सोनवणे,संगीता बोरुडे यांनी या उपक्रमासाठी अथक परिश्रम घेतले.
0 Response to "सोजाई आदिवासी महिला विकास फाउंडेशनच्या वतीने महिलांसाठी दिघी पुणे येथे दहा दिवस मोफत दांडिया(गरबा) कार्यशाळेचे आयोजन"
एक टिप्पणी भेजें