गणेश उत्सवातून समाजात नांदतो एकोपा, ढिवरखेड्यात आनंदाची उधळण
शुक्रवार, 19 सितंबर 2025
Comment
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज "
भंडारा :- गणेश उत्सव समाजात एकोपा नांदवतो. सर्वांच्या उत्साहाला आनंद पुरवितो. दहा दिवसाचा गणेश उत्सव पितृपक्षातही उत्सवाचा मानला जातो. लाखनी तालुक्यातील ढिवरखेडा येथील नागरिकांनी सरपंच गणेश हत्तीमारे यांच्या अध्यक्षतेखाली स्थापना करून दररोज विधी व पूजन व स्पर्धांचे आयोजन सुरू आहे.
भारतीय समाज उत्सव प्रिय आहे. प्रत्येक दिवस उत्सवात पार पाडून आयुष्य गोड करण्याची संस्कृती आजही टिकून आहे. गणेशचतुर्थी निमित्त जिल्ह्यात मस्कऱ्या गणेश उत्सव सुरू आहे. ग्रामीण भागात हा उत्सव मोठ्या उत्साहाने सर्वांच्या सहभागातून पार पाडला जात आहे. याला पारंपारिकतेचा आधार सुद्धा आहे. श्रद्धा संस्कृती टिकून समाजात शांतता व सुव्यवस्था नांदण्याकरिता गणेश उत्सव उत्तम साधन म्हणून स्वीकारण्यात आला आहे.
दररोज विविध स्पर्धा...
ग्रामीण भागात सायंकाळी सहा वाजेनंतर गणेश उत्सवात अनेक स्पर्धांचे आयोजन सुरू आहे. काळानुरूप विविध शारीरिक बौद्धिक स्पर्धा आयोजित करून बच्चेकंपनीच्या उत्साह द्विगुणित सुरू आहे.
भजन गायन शिकण्याची संधी..
रात्री जेवणानंतर गणेशोत्सवाच्या मंडपात किमान एक तास भजन करण्याची परंपरा आजही कायम आहे. या भजन मंडळातून नव्या पिढीला भजनाचा गंध व गायनाचा आस्वाद मिळतो. यातूनच पुढची पिढी शिक्षण घेऊन थोरामोठ्यांच्या जीवनावरील परिणाम स्वतः स्वीकारतो. त्यामुळे जगाच्या पातळीवर सर्वात जास्त धार्मिक प्रवृत्ती भारतात आजही कायम आहे.
नवरात्रीच्या पूर्वी विसर्जन...
नवरात्र उत्सव २२ सप्टेंबर सोमवारला नियोजित आहे. तत्पूर्वी मस्कऱ्या गणपतीचे विसर्जन पार पडणार आहे. शनिवार व रविवार ला मस्कऱ्या गणपतीपुडे गोपालकाला व महाप्रसादाचे सुद्धा आयोजन नियोजित आहे. पोलीस विभाग सुद्धा याकरिता सेवा पुरवीत आहे.
मस्कऱ्या (हडकप) गणेशोत्सव गावकऱ्यांच्या सहकार्याने सुरू आहे. यात विद्यार्थीवर्गांचे सुद्धा सहकार्य आहे. यातून समाजप्रबोधन सुद्धा सुरू आहे. शांतता व सुव्यवस्था टिकविण्याकरिता गणेशोत्सव प्रभारी साधन आहे.
सरपंच गणेश हत्तीमारे ढिवरखेडा
0 Response to "गणेश उत्सवातून समाजात नांदतो एकोपा, ढिवरखेड्यात आनंदाची उधळण"
एक टिप्पणी भेजें