पालांदूर येथे मा दंतेश्वरी सभागृहात सार्वजनिक नवरात्र उत्सव
रविवार, 21 सितंबर 2025
Comment
• लाखनी तालुक्यातील पालांदूर येथे सर्वात मोठा नवरात्र उत्सव
• नऊ दिवस विविध कार्यक्रमांची मेजवानी
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
पालांदूर :- येथील मा दंतेश्वरी पटांगणावर (सभागृहात) सार्वजनिक नवरात्र उत्सव उत्साही वातावरणात भक्तगणांच्या सोबतीने उद्यापासून सुरू होत आहे. मंडळाचे कार्यकर्ते गत महिनाभरापासून मेहनत घेत आहेत. भव्यदिव्य १ एकर जागेत नवरात्र उत्सव दरवर्षीप्रमाणे यावर्षी सुद्धा विद्युत रोषणाईने आनंद पूर्वीत आहे.
पालांदूर येथील संजय नगरातील पोलीस ठाणे रस्त्यावरील मा दंतेश्वरी पटांगणावर निसर्गाच्या विविध छटायुक्त वातावरणात नवरात्री उत्सव सुरू होत आहे. भव्य कलश मंदिर सुद्धा अपडेट करण्यात आला आहे. भाविकांनी गत महिनाभरापासून आपला कलस नोंद करून ठेवलेला आहे. कलशांचे नोंदणी सुरू आहे.
सकाळ संध्याकाळ महाआरती...
मान्यवर मंडळींच्या हस्ते दररोज महाआरती केली जाते. यावेळी परिसरातील भक्तगण मोठ्या संख्येने हजर असतो. अत्यंत नयनरम्य व मनमोहक असा हा नवरात्री उत्सव सर्वांच्या सहकार्याने पालांदुरात आनंद पुरवीत आहे.
गरबा नृत्याची धमाल...
श्रीहरी नंदनवार, पांडुरंग पराते, वसंता धकाते, यशवंत धकाते, तामदेव नंदनवार, निताराम नंदनवार, खुशाल पराते आदींनी गुजरात राज्यातील सुरत इथून गरबा नृत्याचे काही टिप्स घेत स्थानिक विद्यार्थ्यांना शिकविले आहेत. त्यांच्या गरबा अख्या परिसरात सुपरिचित आहे. मंडळाचे अध्यक्ष गोविंदा धकाते गुरुजी यांच्या प्रमुख मार्गदर्शनात नवरात्र उत्सव गोड करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
0 Response to "पालांदूर येथे मा दंतेश्वरी सभागृहात सार्वजनिक नवरात्र उत्सव "
एक टिप्पणी भेजें