कविता (संगीत गीत)
रविवार, 21 सितंबर 2025
Comment
हो भिमापरी गुण गुणवान रे
खावून भिमाची आन आन रे
होऊ नको तु बेईमान मान रे !१!
धडे शिकावे स्वाभीमानाचे
चाडू नको रे पाय कुणाचे
जाळ तुझ्यातील दोष दोष रे!२!
उचल तु पाऊल ठोष ठोष
कर विक्रमी जयघोष घोष
मिळविण्या जगी बहूमान रे!३!
अन्यायाची ही चिड असू दे
निती नेमाने नेक असू दे
होता जसा भिम एक एक रे!४!
उक्तव्य तव निर्भिड असु दे
ठेवूनी तयाची जान असू दे
लावून पणाला प्राण प्राण रे!५!
टेकूनी गुडघे ना नामर्दानी
सांगत फिरतो अपूली ग-हाणी
विचाराने तू विचार सांग रे!६!
जर असशील तू भिम भक्त
जयभिम मुखी फक्त फक्त
गौतम राख इमान मान रे!७!
लोककवी गौतम थोटे
९६३७७०८५९३
गौतम नगरी चौफे
0 Response to "कविता (संगीत गीत)"
एक टिप्पणी भेजें