बौद्ध महिलेला जातीय द्वेषणातून शिव्या..
सोमवार, 15 सितंबर 2025
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
वाशिम :- जिल्ह्यातील धानोरा बु.मंगरुळपीर, येथील काही जातीवादी व्यक्तींनी 15 सप्टेंबरच्या रात्री 12.30 ते 1 वाजेच्या दरम्यान बौद्ध महिलेला जातीय देशातून शिव्या देण्याची घटना नुकतीच उघडकीस आलेली आहे. याबाबत सविस्तर माहिती अशी की,बॅनर वरून किरकोळ भांडण झालं. त्यानंतर दुसऱ्या दिवशी बौद्ध वस्तीचे पाणी रोखण्यात आलं.पाणी का सोडलं नाही हे विचारण्यास गेलेल्या बौद्ध महिलांना अशी शिवी देण्यात आली.
चला रे आपण पोलीस स्टेशनला जाऊ म्हणताच अचानक लाकडं काढून हल्ला केला.यात अनेकजण जखमी झाले.
धक्कादायक माहिती आहे पीडिताला पोलीस स्टेशनला आहेत.त्यांनी जे सांगितलं ते भयंकर आहे.
पीडित दलितांनी ऍट्रॉसिटी ऍक्ट अंतर्गत जातीयवादी प्रवृत्तीवर केस केली .म्हणून 7 बौद्ध महिला व 8 बौद्ध तरुण ज्यात विद्धार्थी देखील आहेत त्यांच्यावर दरोडा टाकल्याचा खोटे गुन्हा नोंद केला आहे.
अन्याय झाला तो सर्व कॅमेऱ्यात कैद आहे. तरी सुद्धा पोलीसांनी राजकीय दबावाखाली एकतर्फी अन्यायकारक कार्यवाही केली आहे.एक तर पोलीसांना माहिती होतं .
जातीय भांडण होणार तरी कोणतीहि प्रतिबंधात्मक कार्यवाही केली नाही. आणि अखेर जातीय हल्ला झाला. तात्काळ सोशल मीडियावर जी व्हिडिओ व्हायरल झाली तो व्यक्ती जातीयवादी दलित महिलांना शिव्या देतोय त्याला अटक करावी.पाणी का रोखले याची चौकशी करावी.
खोटे टाकलेले गुन्हे मागे घ्यावेत.वाशीम पोलीस अधीक्षकांनी या व्हिडीओ ची दखल घ्यावी.गृहमंत्र्यांनी दखल घ्यावी. राखीव मतदारसंघात भाजपच्या आमदाराच्या मतदारसंघात स्वतःला दलित समजणाऱ्या आमदाराच्या मतदारसंघात दलितांना कसे पाणी नाकारले जातंय, कशा शिव्या दिल्या जातायत हे गंभीर आहे.बौद्ध समाजाचे मत ज्यांना ज्यांना लागतात त्यांनी या घटनेची दखल घेतली नाही.विधार्थी महिला यांच्यावरच कार्यवाही व्हावी!पोलीस उपअधीक्षक,पोलीस निरीक्षक यांच्या हलगर्जी भूमिकेमुळे हे घडलंय तात्काळ यांचं निलंबन झालं पाहिजे.या शिव्या देणाऱ्या,हल्ला करणाऱ्यांना जर अटक झाली नाही तर मात्र राज्यभर आंदोलन केल्याशिवाय राहणार नाही आम्ही शांत बसणार नाही हा इशारा अशा इशारा सम्राट अशोक सेनेचे आकाश दादा शिरसाट यांनी दिलेला आहे.
0 Response to "बौद्ध महिलेला जातीय द्वेषणातून शिव्या.."
एक टिप्पणी भेजें