एमआरपी पेक्षा अधिक दराने देशी दारू विक्री
सोमवार, 15 सितंबर 2025
Comment
परवानाधारक देशी दारू विक्रेत्यांकडून तळीरामांची लूट
नरेन्द्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- एमआरपी पेक्षा अधिक दराने उत्पादन विक्री केल्यास गुन्हा ठरत असून याकरिता दंड व कारावास अशी शिक्षेची कायद्यात तरतूद असली तरी उत्पादन शुल्क विभागातील काही भ्रष्ट अधिकाऱ्यांमुळे शासनाची उद्देशपूर्ती होत नसल्याचा प्रत्यय लाखनी तालुक्यात आला. राज्य उत्पादन शुल्क उपनिरीक्षकाचे आशीर्वादाने परवाना धारक फुटकळ(चिल्लर) देशी दारू विक्रेत्यांकडून किमतीपेक्षा अधिक दराने दारू विक्री केली जात असल्याचे वास्तव समोर आले आहे. अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांनी या गंभीर बाबीची दखल घेणे आवश्यक झाले आहे.
देशी दारू दुकानाची तपासणी करणे, अवैध दारू विक्री व वाहतुकीवर प्रतिबंध लावण्याचे काम राज्य उत्पादन शुल्क विभागाचे असून त्याकरिता लाखनी तालुक्यात उपनिरिक्षकाची नेमणूक करण्यात आली असून त्यांचेकडे अवैध दारू विक्री तथा किमतीपेक्षा अधिक दराने दारू विक्री करणाऱ्या परवाना धारकावर कारवाई करण्याचे काम सोपविण्यात आले आहे. लाखनी तालुक्यात पिंपळगाव-१, पोहरा-१, पालांदूर-३ व लाखनी-३ देशी दारूची दुकाने असली तरी यातील अनेक देशी दारू दुकाने आंध्र प्रदेशातील अण्णा लोक चालवित असल्याचे विश्वसनीय वृत्त आहे. त्याचे राज्य उत्पादक शुल्क विभागातील अधिकाऱ्यांशी अर्थपूर्ण संबंध असल्यामुळे १८० मिली दारूचे पव्व्याची किंमत ८० रुपये असताना ९० रुपये घेण्यात येते. तर ९० एमएल चे पव्व्याची किंमत ४० रुपये असताना ५० रुपये घेऊन तळीरामांची लूट केली जात असल्याची ओरड होत आहे. मुरमाडी येथील एक दारू शौकिन सहकाऱ्यांसह रविवारी यातील काही देशीदारू दुकानात दारूचा पव्वा घेण्यासाठी गेले असता १८० एमएल च्या दारूच्या पव्व्याचे ९० रुपये घेतल्याने विचारणा केली असता आम्ही ९० च रुपये घेतो. हे राज्य उत्पादन शुल्क अधिकाऱ्यांनाही माहिती असल्याचे सांगितल्याने आबकारी विभागाच्या छत्रछायेखाली तळीरामांची लूट होत असल्याचे यावरून दिसून येते. अधीक्षक राज्य उत्पादन शुल्क यांनी तो उपनिरीक्षक कोण ? याचा शोध घेऊन त्याचेवर कारवाई करणे गरजेचे झाले आहे.
0 Response to "एमआरपी पेक्षा अधिक दराने देशी दारू विक्री "
एक टिप्पणी भेजें