खुनारी येथे पाणंद रस्त्याची मोजणी शेतकऱ्यांना मिळणार हक्काचा रस्ता महसूल विभागाचे स्तुत्य अभियान .
शुक्रवार, 19 सितंबर 2025
 Comment 
नरेंद्र मेश्राम 
"साप्ताहिक जनता की आवाज" 
पालांदूर :- लगतच्या खुनारी येथील शेत शिवारात जाण्याकरिता पाणंद रस्ता सुदृढ व्हावा याकरिता महसूल विभागाने पुढाकार घेतला असून तत्काळ रस्त्याच्या मोजणी करिता गावचे सरपंच गंगाधर सेलोकर यांच्या प्रमुख उपस्थितीत मोजणीचा श्रीगणेशा पार पडला.
पाणंद रस्ते अत्यंत बिकट व अतिक्रमणित ठरलेले आहेत. कित्येक रस्ते कागदावर सुद्धा नाहीत. तर काही रस्ते पारंपारिकतेने  वहिवाटीत आहेत, मात्र नकाशावर नाहीत. अशा रस्त्यांचा शोध घेण्याची मोहीम शासनाने आखलेली आहे. या अभियानाचा शेतकरी वर्गातून कौतुक होत आहे. लाखनी तालुक्यातील खुनारी येथील शेत शिवारात तलाठी वालमंडाले, तंटामुक्त अध्यक्ष शंकर खराबे, अरविंद सेलोकर, सुधीर सेलोकर, रामेश्वर मेश्राम, ज्ञानेश्वर सिंघनजुडे, रूपचंद चौधरी, पुंडलिक सेलोकर, गणेश चेटुले, पुजा सिंगनजुडे व शेतकरी यावेळी उपस्थित होते.
0 Response to "खुनारी येथे पाणंद रस्त्याची मोजणी शेतकऱ्यांना मिळणार हक्काचा रस्ता महसूल विभागाचे स्तुत्य अभियान ."
एक टिप्पणी भेजें