पवनीत प्रत्येक सोमवारी होणार पालकमंत्र्यांचा जनता दरबार’
शनिवार, 6 सितंबर 2025
Comment
• नागरिकांनी आपल्या तक्रारी वेळेत सादर करण्याचे आवाहन
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- पवनी तालुक्यातील नागरिकांसाठी आनंदाची बातमी असून भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री यांच्या निर्देशानुसार पवनी तहसील कार्यालयात आता प्रत्येक सोमवारला ‘जनता दरबार’ आयोजित करण्यात येणार आहे. या दरबारात सर्वसामान्य नागरिकांना थेट आपल्या तक्रारी, निवेदने व अर्ज सादर करण्याची संधी मिळणार आहे.
८ सप्टेंबरला प्रथमच जनता दरबार दर सोमवारला जनता दरबार
२०२५ या उपक्रमाअंतर्गत येत्या ८ सप्टेंबर रोजी (सोमवार) सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत तहसील कार्यालय, पवनी येथे नागरिकांकडून तक्रारी व निवेदने स्वीकारली जाणार आहेत. विशेष म्हणजे, त्याच दिवशी दुपारी १ वाजता अर्जांवर सुनावणी होणार आहे. त्यामुळे नागरिकांच्या अडचणींचे त्वरित निवारण होण्याचा मार्ग मोकळा होणार आहे. या जनता दरबारात नागरिकांनी लेखी स्वरूपात वेळेच्या आत आपल्या तक्रारी सादर कराव्यात असे आवाहन
तहसीलदार किरण भास्कर वागस्कर यांनी दिलेल्या माहितीनुसार तहसील कार्यालयातून अर्जाचा नमुना उपलब्ध करून देण्यात येईल. इच्छुक नागरिकांनी ठराविक नमुन्यात व निश्चित वेळेत तक्रार अथवा निवेदन प्रत्यक्ष हजर राहून सादर करावे, असे आवाहन प्रशासनाने केले आहे.या जनता दरबारला तालुक्यातील सर्व विभाग प्रमुख उपस्थीत राहणार आहेत. या जनता दरबारामुळे
पवनी तालुक्यातील जनतेला आपल्या प्रश्नांवर थेट पालकमंत्र्यांसमोर आपल्या समस्या अंड्याचे व्यासपीठ उपलब्ध होणार आहे. त्यामुळे पवनी तालुक्यातील नागरिकांनी आपल्या समस्या जनता दरबारात ते की स्वरूपात सादर करून समस्येचे निराकरण करावे असे आवाहन तहसीलदार पवनी यांनी केलेले आहे.
-
0 Response to "पवनीत प्रत्येक सोमवारी होणार पालकमंत्र्यांचा जनता दरबार’"
एक टिप्पणी भेजें