-->

Happy Diwali

Happy Diwali
भंडारा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे आगामी निवडणुकी संबंधी महत्वाची बैठक

भंडारा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे आगामी निवडणुकी संबंधी महत्वाची बैठक


"साप्ताहिक जनता की आवाज" 
 वृत्त प्रतिनिधी 


भंडारा :- आज दिनांक १५/०९/२०२५ ला भंडारा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीच्या कार्यकारीणीची आगामी निवडणूक संबंधाने बैठक दुपारी १.०० वाजता राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे कार्यालय तिलक वार्ड, भंडारा येथे आयोजित करण्यात आली. जिल्हाध्यक्ष, श्री. नानाभाऊ पंचबुध्दे, व प्रदेश महासचिव श्री. धनंजय दलाल यांच्या मार्गदर्शनात व प्रमुख उपस्थितीत बैठक घेण्यात आली. जिल्हाध्यक्ष यांनी सभेला संबोधित करतांनी  संघटित राहून काम करणे गरजेचे आहे. व सर्व वॉर्डात एकत्रित राहून मोठ्या संख्येनेप्रचार करणे आवश्यक आहे. तसेच श्री.दलाल यांनी निवडणूकीला वेळ कमी राहीलेला असून सर्व कार्यकत्यांना कामाला लागण्याच्या सुचना केल्या.  नगर परीषद निवडणुकीत राष्ट्रवादी पक्षाचे वर्चस्व कसे निर्माण करता येईल या संबंधी मत व्यक्त केले.  महिला जिल्हाध्यक्षा सरिताताई मदनकर, डॉ. श्रीकांत वैरागडे,  सौ. मंजुषा बुरडे, मुश्ताक सलाम, नरेंद्र झंझाड, सुनिल साखरकर, अमर उजवने, जुमाला बोरकर, यांनी निवडणूक संबंधी महत्वाच्या सुचना दिल्या. तसेच कार्यक्रमाचे सुत्रसंचालन हेमंत महाकाळकर यांनी केले. या प्रसंगी प्रमुख उपस्थितांमध्ये डॉ. रविंद्र वानखेडे, डॉ. जगदिश निंबार्ते,  शेखर (बाळाभाऊ) गभने, प्रशांत देशकर, अशोक सांडेकर, महेंद्र वाहाने, मनिष वासनिक, प्रदिप सुखदेवे, आरजु मेश्राम, उमेश ठाकरे, राजु पटेल, राजु शक्तिकर, जुगल भोंगाडे, लोकेश नगरे, मेहमुद खान, संगिता चव्हाण, किर्ती कुंभरे, खुशाल निपाने, अजय निखार, मोहीत सार्वे, सुषमा माटे, अमन मेश्राम, गणेश बाणेवार, राहुल वाघमारे, विद्या साखरे, वीणा बन्सोड व फार मोठया संख्येने पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.

0 Response to "भंडारा शहर राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी तर्फे आगामी निवडणुकी संबंधी महत्वाची बैठक"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article