इंडिया फुटबॉल संघातील गोलकीपर कुमारी पायल बसुदेचा समाजतर्फे सत्कार.
शनिवार, 6 सितंबर 2025
Comment
सोनू संजीव क्षेत्रे
"साप्ताहिक जनता की आवाज"
उल्हासनगर: - दिनांक 05.09.2025 रोजी श्री.सोमवंशी सहस्त्रार्जुन क्षत्रिय समाज उल्हासनगर तर्फे इंडिया फुटबॉल संघातील गोलकीपर कुमारी पायल रमेश बसुदे हिचा सत्कार करण्यात आला.
भारताची गोलकिपर पायल बसुदे यांनी भारतासाठी अनेक ट्रॉफी जिंकून देशाचा मान उंचावला आहे. सतत मेहनत, जिद्द आणि क्रीडाप्रती असलेलं अखंड समर्पण यामुळे त्या आज भारतातील सर्वोत्तम गोलकिपर म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या खेळातील अचूकता, जलद निर्णयक्षमता आणि कठोर परिश्रमामुळे त्यांनी केवळ संघालाच नव्हे तर संपूर्ण भारताला अभिमान वाटेल अशी कामगिरी केली आहे. पायल बसुदे या खऱ्या अर्थाने मेहनती, कुशल आणि देशासाठी सर्वोत्तम गोलकिपर ठरल्या आहेत.
पायलजींच्या हस्ते लहान मुलांना गिफ्ट व पुस्तके वाटप करण्यात आले. यावेळी पायलजींनी सांगितले की – *“शिस्त, जिद्द आणि चिकाटी असेल तर कोणतेही ध्येय साध्य करता येते.”*
कार्यक्रमात महिला मंडळाच्या अध्यक्षा *सौ. लक्ष्मी बसुदे यांनी मार्गदर्शन केले. तर नव्या कार्यकारिणीचे अध्यक्ष श्री. श्यामजी गुजराती* यांनी सांगितले की – *“संगठित राहून समाजहिताचे अनेक कार्यक्रम राबवले जाणार आहेत, त्यासाठी सर्वांचे सहकार्य आवश्यक आहे.”*
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन *आकाश दीपक मेंगजी* यांनी केले.
0 Response to "इंडिया फुटबॉल संघातील गोलकीपर कुमारी पायल बसुदेचा समाजतर्फे सत्कार."
एक टिप्पणी भेजें