समर्थ महाविद्यालय लाखनीच्या ‘अर्चना’ वार्षिकांकाला विद्यापीठाचा पुरस्कार.
शनिवार, 6 सितंबर 2025
Comment
नरेंद्र मेश्राम
"सप्ताहिक की आवाज"
लाखनी :- स्थानिक समर्थ महाविद्यालय, लाखनी येथे दरवर्षी प्रकाशित होणारा ‘अर्चना’ वार्षिकांक यंदा विद्यापीठ स्तरीय वार्षिकांक 2023-24’ या पुरस्काराने सन्मानित करण्यात आला.
विद्यापीठाच्या वतीने शिक्षक दिनाचे औचित्य साधून हा गौरव सोहळा दिनांक ५ सप्टेंबर २०२५ रोजी गुरुनानक भवन, नागपूर येथे आयोजित करण्यात आला होता. यावेळी राष्ट्रीय पर्यावरण अभियांत्रिकी संशोधन संस्था (NEERI), नागपूर चे माजी संचालक डॉ. सतीश वटे, प्र-कुलगुरू डॉ. सुभाष कोंडावार, कुलसचिव राजू हिवसे तसेच डॉ. हरीश पालीवाल यांच्या हस्ते महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिगांबर कापसे, डॉ. बंडू चौधरी व प्रा. अजिंक्य भांडारकर यांना प्रमाणपत्र, धनादेश, विशेष सन्मानचिन्ह प्रदान करण्यात आले.
‘अर्चना’ वार्षिकांक हा समर्थ महाविद्यालयाचा दीर्घ परंपरेचा वार्षिक प्रकाशन असून, तो सन १९६७ पासून सातत्याने प्रकाशित होत आहे. नुकत्याच संपन्न झालेल्या महाविद्यालयाच्या हीरक महोत्सवी वर्षानिमित्त यावर्षीच्या अंकाच्या मुखपृष्ठावर मागील ६० वर्षांतील विविध अंकांची प्रतीकृती दर्शविण्यात आली होती. वार्षिकांकात विद्यार्थ्यांच्या सर्जनशीलतेला वाव देणारे लेख, कविता तसेच विविध विभागीय कार्यक्रमांचे अहवाल समाविष्ट करून तो अधिक समृद्ध करण्यात आला होता.
या यशामुळे समर्थ महाविद्यालयाचे प्राचार्य, प्राध्यापकवर्ग, विद्यार्थी व माजी विद्यार्थी यांच्यात आनंदाचे वातावरण असून, हा सन्मान महाविद्यालयाच्या शैक्षणिक, सांस्कृतिक आणि साहित्यिक प्रगतीचे केंद्र असल्याचे प्रतिपादन करण्यात येत आहे.
0 Response to "समर्थ महाविद्यालय लाखनीच्या ‘अर्चना’ वार्षिकांकाला विद्यापीठाचा पुरस्कार."
एक टिप्पणी भेजें