-->

Happy Diwali

Happy Diwali
पालकमंत्री पंकजजी भोयर यांची ग्रामपंचायत पाथरी पुनर्वसन ला भेट.

पालकमंत्री पंकजजी भोयर यांची ग्रामपंचायत पाथरी पुनर्वसन ला भेट.


  
• सरपंच पल्लवी समरीत यांनी त्यांचा केला नागरी सत्कार 

संजीव भांबोरे 
"साप्ताहिक जनता की आवाज" 

भंडारा :- पवनी तालुक्यातील पाथरी पुनर्वसन येथे दिनांक २१/०९/२०२५ ला भंडारा जिल्ह्याचे पालकमंत्री तथा राज्यमंत्री यांनी ग्रामपंचायत पाथरी पुनर्वसन येथे भेट दिली असता सरपंच सौ पल्लवी प्रफुल्ल समरीत ग्रामपंचायत पाथरी पुनर्वसन यांनी औक्षवन करून शाल ,श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन स्वागत केले. तसेच गावातील समस्यांचे लेखी निवेदन दिले .त्यात प्रामुख्याने भाजपा तालुका अध्यक्ष मंडळ अड्याळ प्रकाश कुर्जेकर
 यांनी पालकमंत्री पंकज भोयर यांना पाथरी पुनर्वसन येथील जुन्या अतिक्रमणाची चौकशी करून जागा खुली करून देण्यात यावी, घरकुल लाभार्थ्यांना पाच ब्रास रेती मोफत देण्यात यावी, पाथरी पुनर्वसन येथील अरुंद नाल्या,रस्ते नव्याने दुरुस्त देण्यात यावे ,पात्री पुनर्वसन टोली गावाचे सीमांकन करून क सिट देण्यात यावी, 


प्रकल्पग्रस्तांचे नवीन प्रमाणपत्र व हस्तांतरण प्रक्रिया शुलभ करण्यात यावी, डावा कालव्याचे दुरुस्तीचे काम लवकरात लवकर पूर्ण करण्यात यावे जेणेकरून शेतकऱ्यांना भरपूर पाणी मिळू शकेल अश्या अनेक समस्यांची निवेदन देण्यात आले. यावेळी जिल्हाअध्यक्ष आशुभाऊ गोंडाने, प्रदीप पडोळे डिस्ट्रिक्ट को-ऑपरेटिव बँक उपाध्यक्ष, अड्याळ मंडळ अध्यक्ष प्रकाश कुर्झेकर, हरिहर नागपुरे, केवळराम मरघडे, ज्योत्सना बोरकर, शुभांगी हटवार, परशुराम समरीत, प्रफुल्ल समरीत, सोमा लोहकर, प्रभावती खोब्रागडे, अमोल कुर्झेकर, रघुत्तम कुर्झेकर, श्रीधर वैद्य, बंडू जांभूळकर, राकेश मोहरकर, राकेश सावरकर, वसंता गंथाळे, वैशाली गभणे, मनोज खाणखुरे,राजू जिभकाटे,पोलिस पाटील, आशा, अंगणवाडी सेविका, बचत गट महिला, आणि बहुसंख्येने पाथरी ग्रामस्त उपस्थित होते.

0 Response to "पालकमंत्री पंकजजी भोयर यांची ग्रामपंचायत पाथरी पुनर्वसन ला भेट."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article