अड्याळ येथे 69 वा धम्मचक्र अनुवर्तन दिन उत्साहात साजरा.
बुधवार, 15 अक्टूबर 2025
2 Comments
नरेंद्र मेश्राम
"सप्ताहिक जनता की आवाज"
पवनी :- अड्याळ येथील वैशाली बुद्धविहार बाजारपेठ अड्याळ येथे दिनांक 14 ऑक्टोबर 2025 रोज मंगळवार सकाळी 11.00 वाजता धमचक्र प्रवर्तन (अनुवर्तन) दिनाचा कार्यक्रम पार पडला.
कार्यक्रमाचे अध्यक्ष स्थानी सरपंच श्री शिवशंकरजी मुंगाटे साहेब होते ,प्रमुख अतिथी श्री छत्रपती शिवाजी महाराज जयंती उत्सव समिती चे मुख्य संयोजक श्री मयुर कोल्हटकर, ग्राम पंचायत सदस्य श्री सोहेल खान, ग्राम पंचायत सदस्य श्री आशिक अंबादे ,सौ वसुश्री टेंभुर्णे,, डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती उत्सव समिती चे अध्यक्ष श्री अशोकजी वाहने, उपाध्यक्ष श्री प्रकाश दहिवले,सचिव डॉ. गणेशजी मेश्राम,श्री गौतम जनबंधू सर, ग्रामविकास अधिकारी श्री हिरालालजी खंडाईत ,अमोल थुलकर,विकास टेंभुर्णे, मयुर खोब्रागडे, रणजीत लोखंडे,प्रमोद मोटघरे, रविकांत डोंगरे,अशोक कोचे, तसेच बौद्ध उपासिका डॉ शीला मेश्राम,सौ कुंदा वाहने ,सौ कल्पना जांभूळकर, श्रीमती साधना कासारे,सौ मीनाताई शहारे,श्रीमती वर्षा रामटेके ,सौ नलुताई कराडे,सौ मंजुषा जांभूळकर , स्वर्णलता टेंभुर्ने,आशाबाई अंबादे, सौ पंचफुला कराडे,श्रीमती गीताबाई जांभूळकर,सौ तरुणा जनबंधू,सौ काजूबाई साखरे,इत्यादी सर्व समाज बांधव ,भगिनी उपास्थित होते,सर्व प्रथम सरपंच श्री शिवशंकर मुंगाटे साहेब आणि सर्व उपस्थित मान्यवरांनी भगवान गौतम बुद्ध मूर्तीला दीपप्रज्वलन केले, त्यानंतर विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याला माल्यार्पण काण्यात आले,त्यानंतर सामूहिक बुद्ध वंदना घेण्यात आली.
उपस्थित मान्यवरांनी धम्मचक्र अनुवर्तन दिनाबाबत मोलाचे मार्गदर्शन केले,महिलांनी भीम गीत सादर केले , कार्यक्रमाचे संचालन वैशाली बुद्धविहार बाजारपेठ अड्याळ चे अध्यक्ष श्री मुनीश्वर मोतीरामजी बोदलकर यांनी केले, आभार प्रदर्शन श्री विकास टेंभुर्णे यांनी केले, प्रसाद वितरणानंतर कार्यक्रमाचा समारोप करण्यात आला, सर्वांना धम्मचक्र प्रवर्तन दिनाच्या शुभेच्छा देण्यात आल्या,,,जयभीम.. नमो बुद्धाय,, जय संविधान..
Very nice 👍👍👍👍🙂🙂
जवाब देंहटाएंJaybheem ji saheb Namo BUDDHAY Namo BUDDHAY Namo Sanghay Congratulations to all of you Jaybheem
जवाब देंहटाएं