अड्याळ येथे मोफत दमा औषध वितरण
शुक्रवार, 3 अक्टूबर 2025
Comment
पंकज दिलीपराव वानखेडे
9923167120
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- अड्याळ येथील प्रसिद्ध हनुमंत देवस्थानच्या प्रांगणात दरवर्षीप्रमाणे यावर्षीसुद्धा शरद पौर्णिमा ( कोजागरी) निमित्त दिनांक ०६ ऑक्टोबर २०२५ रोज सोमवार ला हनुमान देवस्थान पंचकमिटीच्या वतीने मध्यरात्री गर्भगृहात विशेष पूजा करून मंत्रोच्चारात शास्त्रोक्त पद्धतीने तयार केलेल्या दम्याच्या औषधाचे वितरण करण्यात येणार आहे. देवस्थानतर्फे गेल्या अनेक वर्षांपासून दमा औषधाचे वितरण केले जात असून, हजारो दमा रुग्णांना आजारापासून मुक्ती मिळाली आहे. दिनांक ०६ ऑक्टोबर २०२५ रोज सोमवार ला जास्तीत जास्त भाविक भक्तांनी तथा रुग्णांनी लाभ घ्यावा, असे आवाहन हनुमान देवस्थान कमिटी अड्याळ ने केले आहे.
0 Response to "अड्याळ येथे मोफत दमा औषध वितरण"
एक टिप्पणी भेजें