-->

Happy Diwali

Happy Diwali
दुर्गा पुजा करण्याच्या वादातून जातीवाचक शिवीगाळ.

दुर्गा पुजा करण्याच्या वादातून जातीवाचक शिवीगाळ.

• पती-पत्नीस मारहाण आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल.

"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्त प्रतिनिधी 

भंडारा :- अख्या  देशात विजय दशमी दिवस हा सामाजिक एकता    अखंडता अहिंसेचा न्यायाचा विजयी दिवस म्हणून मानला  जातो.परंतु काही समाज कटंकामुळे जातीय हिंस्त्र,सामाजिक तेढ निर्माण करण्याचे काम करतात त्यापैकी   तुमसर तालुक्यातील धुटेरा येथे दि २ ऑक्टोंबर रोज गुरुवारला सायं. ७:०० वा.च्या सुमारास फिर्यादी जितेंद्र डोंगरे हे गावातच दुर्गा देवीची पूजा करण्यास गेला असता यावेळी आरोपी बुधराज गोपाले व रविकरण लांजेवार यांनी फिर्यादीला तू जातीचा महार आहेस, तू पूजा करू नको असे हटकले असता फिर्यादीने त्यांचा विरोध केला. दरम्यान, आरोपींनी फिर्यादीला मारहाण करण्यास सुरुवात केली यावेळी फिर्यादीची पत्नी रेखा डोंगरे ही वाद मिटवण्यासाठी आली असता आरोपींनी तिलाही मारहाण करून जीवे मारण्याची धमकी दिली.असता काही गावकऱ्यांच्या मध्यस्तीने अनर्थ टळला असून फिर्यादीने गोबरवाही पोलीस स्टेशन मध्ये तक्रार नोंदविली. आरोपी विरुद्ध अट्रॅसिटी कायदा अंतर्गत गुन्हा दाखल केला व घटनेची गांभीर्य लक्षात घेता भंडारा पोलिस अधिक्षक नुरुल हसन साहेब व चौकशी अधिकारी म्हणून SDPO मयंक माधव यांनी घटनेची माहीती गोबरवाही पोलीस स्टेशन येथे घेतली.

0 Response to "दुर्गा पुजा करण्याच्या वादातून जातीवाचक शिवीगाळ."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article