जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूल च्या विधार्थिनीचा प्रेरणादायी उपक्रम.
शनिवार, 4 अक्टूबर 2025
Comment
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
पालांदूर :- जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूल जेवनाळा येथील कु. रिया महेश मुंदाफोडे हिने सन 2024-25 मध्ये नवोदय प्रवेश परीक्षा तसेच पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत गुणवत्ता प्राप्त करून शाळेचा लौकिक वाढविला आहे. शैक्षणिक क्षेत्रात यश संपादन करीत असतानाच तिने सामाजिक जाणीवेतून एक स्तुत्य पाऊल उचलले आहे.
शाळेच्या भौतिक सुविधा विकासासाठी कु. रिया हिने तब्बल पाच हजार रुपयांची आर्थिक मदत शाळेला देऊन उदार मनाचे दर्शन घडविले आहे. विद्यार्थिनीने दाखविलेल्या या उपक्रमामुळे शाळेच्या विकासात नवी ऊर्जा मिळाली असून शिक्षकवृंद, मुख्याध्यापक तसेच शाळा व्यवस्थापन समितीने तिच्या या योगदानाचे मनःपूर्वक कौतुक केले आहे.
मुख्याध्यापकांनी आपल्या भावना व्यक्त करताना सांगितले की, “कु. रियाने दाखवलेले हे उदार मन इतर विद्यार्थ्यांसाठीही प्रेरणादायी ठरेल. शाळेच्या प्रगतीसाठी हे योगदान मोलाचे आहे.”
कु. रिया मुंदाफोडेच्या या अमूल्य देणगीमुळे शाळेत आनंदाचे व कौतुकाचे वातावरण निर्माण झाले आहे. तिचा हा उपक्रम समाजातही सकारात्मक संदेश देणारा ठरला आहे.
0 Response to "जिल्हा परिषद डिजिटल पब्लिक स्कूल च्या विधार्थिनीचा प्रेरणादायी उपक्रम."
एक टिप्पणी भेजें