महात्मा गांधी युगप्रवर्तक : प्राचार्य डॉ. दिगांबर कापसे.
शनिवार, 4 अक्टूबर 2025
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्त प्रतिनिधी
लाखनी :- स्थानिक समर्थ महाविद्यालय, लाखनी येथे सांस्कृतिक विभाग, राष्ट्रीय सेवा योजना (NSS) व राष्ट्रीय छात्र सेना (NCC) यांच्या संयुक्त विद्यमाने महात्मा गांधी व लालबहादूर शास्त्री यांच्या जयंतीनिमित्त कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.
या कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. दिगांबर कापसे तर प्रमुख अतिथी म्हणून डॉ. धनंजय गभने, प्रा. एकता जाधव व डॉ. बंडू चौधरी व्यासपीठावर उपस्थित होते.
आपल्या अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉ. दिगंबर कापसे यांनी लालबहादूर शास्त्री यांच्या कार्याचा गौरव करताना भारत-पाकिस्तान युद्धकाळातील त्यांच्या संयमशील नेतृत्वाचा विशेष उल्लेख केला. त्यांनी सांगितले की शास्त्रीजींनी सैनिक व नागरिकांचे मनोबल उंचावून देशात एकता आणि धैर्य निर्माण केले. तसेच महात्मा गांधींच्या विचारांचा आढावा घेताना त्यांनी स्पष्ट केले की आज जगभरात गांधी विचारधारा स्वीकारली जात असून सत्य व अहिंसा या मूल्यांच्या आश्रयानेच मानवाचा सर्वांगीण विकास शक्य आहे. आधुनिक युग हे ‘गांधीयुग’ म्हणून ओळखले जाईल, त्या अर्थाने महात्मा गांधी हे खरेच युगप्रवर्तक ठरले आहेत.
कार्यक्रमात आकांक्षा नागदेवे (बी.एस्सी. भाग-३) हिने स्वयंस्फूर्त भाषण करून उपस्थितांची प्रशंसा मिळवली. तसेच गांधी जयंतीनिमित्त राष्ट्रीय सेवा योजना व राष्ट्रीय छात्र सेना यांच्या वतीने दसरा मैदान, समर्थ नगर येथे स्वच्छता अभियान राबवून कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. बंडू चौधरी यांनी केले. सूत्रसंचालन डॉ. संगीता हाडगे यांनी तर आभार प्रदर्शन प्रा. युवराज जांभुळकर यांनी केले.
या प्रसंगी प्रा. लालचंद मेश्राम, डॉ. संदीपकुमार सरया, प्रा. भास्कर पर्वते, प्रा. पूजा नवखरे, प्रा. स्वाती नवले, प्रा. रूपाली खेडेकर, डॉ. सुनंदा रामटेके, प्रा. बाळकृष्ण रामटेके, प्रा. कैवल्य गाभने, प्रा. मिलिंद कांबळे, प्रा. नंदकुमार सावरकर, प्रा. मनीषा मदनकर, प्रा. अजिंक्य भांडारकर यांच्यासह महाविद्यालयातील शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
0 Response to "महात्मा गांधी युगप्रवर्तक : प्राचार्य डॉ. दिगांबर कापसे."
एक टिप्पणी भेजें