पालांदूर येथे रुग्णवाहिका लोकार्पण.
शुक्रवार, 3 अक्टूबर 2025
Comment
• आमदार नाना पटोले व भरत खंडाईत मित्रपरिवार यांचे दातृत्व.
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्त प्रतिनिधी
पालांदूर :- रुग्णसेवा हीच ईश्वर सेवा समजून आमदार नाना पटोले संपूर्ण जिल्हाभर रुग्णसेवा रुग्णवाहिकेच्या माध्यमातून करीत आहेत. पालांदूरला सुद्धा जिल्हा परिषद सर्कल करिता विशेष रुग्णवाहिका देत गरजूंच्या समस्येला न्याय दिला. याकरिता जिल्हा मजूर संघाचे अध्यक्ष भरत खंडाईत यांनी सुद्धा मागणी लावून धरली व स्वतःच रुग्णवाहिका थेट रुग्णसेवेत हजर केली. यावेळी आ. नाना पटोले, भरत खंडाईत, जि प सदस्य सरिता कापसे, सरपंच लता कापसे, पं स. सदस्य योगिता झलके, अध्यक्ष योगेश झलके लाखनी तालुका काँग्रेस कमिटी, कार्यक्रमाचे आयोजक डॉक्टर आशिष गभने, माजी उपसभापती विजय कापसे,माजी जि प सदस्य बिंदूबाई कोचे, माजी सरपंच वैशाली खंडाईत, काँग्रेस पदाधिकारी स्वप्निल खंडाईत, तंमुस अध्यक्ष प्रकाश तलमले व इतर मान्यवर उपस्थित होते. उपस्थितांनी टाळ्यांच्या गजर करीत आरोग्य सेवेचे स्वागत केले.
0 Response to "पालांदूर येथे रुग्णवाहिका लोकार्पण. "
एक टिप्पणी भेजें