बळीराजाच्या घरात दिवाळीला असणार अंधार.
मंगलवार, 14 अक्टूबर 2025
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्त प्रतिनिधी
भंडारा: - शेतकऱ्यांच्या डोळ्यांतलं पाणी, उद्धस्त झालेली घर आणि थंड पडलेलं सरकार यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचं दिवाळं निघालं आहे.
सप्टेंबर या एका महिन्यात राज्यातील शेतकऱ्यांची २६ लाख हेक्टरवरील पिकं उद्वस्त झाली आहेत, ५२ लाख हेक्टरवरील खरीप पिकं पाण्यात गेली आहेत. मोडलेल्या बळीराजाला उभं करण्याऐवजी, आगामी स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका मध्ये सरकार व्यस्त आहे, बैठका सुरू आहेत !
तोंडावर दिवाळी आली आहे, पण शेतकऱ्याना आता कोण विचारत आहे... दिवाळी आधी शेतकऱ्यांना मदत करणार अस सांगत होते.. अजूनही मदत मिळालेली नाही कसली दिवाळी? कुठून आणावे गोडधोड पदार्थ, मुलांसाठी कपडे? हे सरकार म्हणजे बडा घर पोकळ वासा आहे..
किमान हेक्टरी ५०,००० मदत केली पाहिजे, शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली पाहिजे! दिवाळीआधी शेतकऱ्यांना मदत ही झालीच पाहिजे तर त्यांच्या आयुष्यात दिवाळी होईल.
0 Response to "बळीराजाच्या घरात दिवाळीला असणार अंधार."
एक टिप्पणी भेजें