-->

Happy Diwali

Happy Diwali
आपत्ती धोके निवारण दिना' निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिज्ञा.

आपत्ती धोके निवारण दिना' निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिज्ञा.

प्रतिज्ञा घेताना जिल्हा अधिकारी कार्यालयात वाशिम 

"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्त प्रतिनिधी 
  
वाशिम :- संयुक्त राष्ट्र संघाने घोषित केल्यानुसार दरवर्षी १३ ऑक्टोबर हा दिवस 'आपत्ती धोके निवारण दिवस' म्हणून साजरा केला जातो. त्यानिमित्त आज दि. १३ ऑक्टोबर रोजी जिल्हाधिकारी कार्यालयातील राजे वाकाटक सभागृहात आयोजित कार्यक्रमात जिल्हाधिकारी योगेश कुंभेजकर यांच्या अध्यक्षतेखाली प्रतिज्ञा कार्यक्रम संपन्न.
 झालाया प्रसंगी निवासी उपजिल्हाधिकारी राजेंद्र जाधव, जिल्हा आपत्ती व्यवस्थापन अधिकारी शाहू भगत यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी व कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते. उपस्थितांनी खालीलप्रमाणे प्रतिज्ञा केली.

> "मी प्रतिज्ञा करतो/करते की शासनाच्या आपत्ती सौम्यीकरणाच्या विविध उपक्रमात मी सक्रिय सहभाग नोंदवून, आपत्तीपासून माझी, माझ्या परिवाराची, माझ्या समाजाची व सार्वजनिक मालमत्तेची सुरक्षा करण्याविषयी ज्ञान प्राप्त करीन. आपत्ती धोके कमी करणाऱ्या समुदाय-आधारित उपक्रमांमध्ये मी सक्रिय सहभाग घेईन. माझ्या परिवारात व समाजात आपत्तीबद्दल जनजागृती करून, त्यासंबंधी पूर्वतयारी कशी करावी याविषयी सदैव प्रयत्न करीन. राज्यातील आपत्तीप्रवण भागात जिवीत, वित्त व पर्यावरण विषयक हानी होऊ नये म्हणून सदैव कटिबद्ध राहीन.

यावेळी आपत्तीपूर्व तयारी, जनजागृती आणि नागरिकांचा सक्रिय सहभाग यांचे महत्त्व अधोरेखित करण्यात आले. आपत्ती धोके कमी करण्यासाठी सज्जता, जागरूकता आणि सामूहिक जबाबदारीची भावना जोपासण्याचे आवाहनही करण्यात आले.

0 Response to "आपत्ती धोके निवारण दिना' निमित्त जिल्हाधिकारी कार्यालयात प्रतिज्ञा."

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article