-->

Happy Diwali

Happy Diwali
नवनित विद्यालयात खमारी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

नवनित विद्यालयात खमारी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा

"साप्ताहिक जनता की आवाज" 
वृत्त प्रतिनिधी 

मोहाडी :-  दि. १४ ऑक्टोंबर २०२५ ला मोतीस्मृती ज्ञान जागृत बहुउद्देशिय शिक्षण संस्था पेट्रोलपंप (ठाणा), ता. जि. भंडारा व्दारा संचालित नवनित माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय खमारी (बुज.) ता. मोहाडी जि. भंडारा येथे ६९ वा धम्मचक्र प्रवर्तन दिनाचा कार्यक्रम घेण्यात आला. सर्वप्रथम भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला शाळेचे मुख्याध्यापक नरेंद्र गणविर यांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करून मेणबत्ती प्रज्वलीत करण्यात आली. यानंतर उपस्थित कर्मचारी व विद्यार्थ्यांनी अभिवादन केले. भारतामध्ये लृप्त झालेल्या बौद्ध धम्माच चक्र बाबासाहेबानी गतिमान करत धम्मचक्र प्रवर्तन केलं. दि. १४ ऑक्टोंबर १९५६ ला डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी लाखो अनुयायांसोबत बौद्ध धर्माची दिक्षा घेतली. धर्मांतरण सोहळ्याची आठवण म्हणून या दिनाचे अनुपालन करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले.

        या कार्यक्रमास मुख्याध्यापक नरेंद्र गणविर, सुनिल नागदिवे, प्रा. दिनदयाल दमाहे, प्रा. अरुण कांबळे, अशोक गजभिये, अनिरुद्ध गजभिये, संजीव मेश्राम, जान्हवी हरदे, आचल शहारे, अपूर्वा दमाहे, राणी हरदे, दिव्यानी बिरणवार, शेजल पाटील, मानसी पंजरे, अक्षरा दमाहे, आरुषी दमाहे, सुनेरी हरदे, श्रावणी शेंडे, किर्तीका गयगये, अमन उपराडे, विक्की गयगये, रोनक दमाहे, शितल दमाहे, संचिता शहारे, रिंकू हरदे, वंशिका उपराडे, वंशिका गयगये सह शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी व विद्यार्थी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन सुनील नागदिवे यांनी केले.

0 Response to "नवनित विद्यालयात खमारी येथे धम्मचक्र प्रवर्तन दिन साजरा"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article