निंबेकर परिवाराकडून नेत्रदानाचा निर्णय.
गुरुवार, 16 अक्टूबर 2025
Comment
नरेंद्र मेश्राम
"सप्ताहिक जनता की आवाज"
पांलादूर :- स्थानिक लगतच्या पिंडकेपार येतील श्री परसरामजी निंबेकर यांचे वृद्धापकाळाने निधन झाले त्यांच्या बचात त्यांच्या कुटुंबातील त्यांच्या नातवंडांच्या पुढाकाराने आबाजीचे डोळे आपण दान केले पाहिजेत ही जाणीव त्यांच्या निर्माण झाली डॉ. राजेश चंदवानी यांनी त्या मुलांना मार्गदर्शन करून त्या मुलांनी आपल्या वडिलांकडे आग्रह धरला आणि आपण आपल्या आजोबाची डोळे दान करावी असा हट्ट धरला त्या हट्टचा स्वीकार करून वडीलधाऱ्या मंडळींनी त्यांना हा निर्णय योग्य आणि समाजाच्या हिताचा असल्याचे सांगितले यामध्ये मृत परसराम राजाराम निंबेकर यांचे ज्येष्ठ चिरंजीव डॉ. संजयकुमार निंबेकर राष्ट्रीय सेवा योजना समन्वयक भंडारा जिल्हा यांनी पुढाकार घेतला आणि त्या पक्षात त्यांच्या लहान भाऊ डॉ. तुलसीदास निंबेकर प्राचार्य लक्ष्मणराव मानकर इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी यांनी पुढाकार दर्शवत तसेच डॉ. कालिदास निंबेकर यांनी सुद्धा या होकाराला पुढाकार दिला आणि अखेर नेत्रदानाचा निर्णय ठरला या उपक्रमाबद्दल सर्वत्र त्यांचे कौतुक होत आहे.
0 Response to "निंबेकर परिवाराकडून नेत्रदानाचा निर्णय."
एक टिप्पणी भेजें