लाखनी येथे ग्रामीण युवा साहित्य संमेलनाचे आयोजनसंमेलनाध्यक्षपदी प्रा. डॉ. संजयकुमार निंबेकर
गुरुवार, 16 अक्टूबर 2025
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- दिनांक 15 आणि 16 नोव्हेंबर 2025 रोजी लाखनी येथील उत्सव सेलिब्रेशन लान अँड हाल या सभागृहात दोन दिवसीय जिल्हास्तरीय पहिल्या ग्रामीण युवा साहित्य संमेलनाचे आयोजन करण्यात आले असून या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष म्हणून प्रसिद्ध रंगकर्मी आणि समीक्षक प्रा. डॉ.संजयकुमार निंबेकर यांची निवड करण्यात आली आहे. दोन दिवस चाललेल्या या साहित्य संमेलनात दोन परिसंवाद, एक चर्चासत्र,एक कविसंमेलन, अरुण बनसोड यांची खडीगंमत, डॉ.हरिश्चंद्र बोरकर यांची प्रकट मुलाखत, अनिल शेंडे आणि पालिकचंद बिसेन यांचे बासरी वादन, महेंद्र गोंडाने यांचा विनोदी एकपात्री प्रयोग -' सहावी बाळंतीण ', झाडीपट्टीतील युवा कलावंतांचा पंचरंगी लोककलाविष्कार - 'झाडीपट्टीचा धुमधडाका ' असे भरगच्च कार्यक्रम होणार असून उद्घाटन, परिसंवाद, कविसंमेलन आणि समारोपात महाराष्ट्रातील सुप्रसिद्ध साहित्यिक आणि विचारवंत उपस्थित राहणार आहेत. या कार्यक्रमात काही मान्यवरांच्या पुस्तकांचे प्रकाशनही होणार आहे .मराठी भाषा विभाग, महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ महाराष्ट्र शासन आणि मुक्ताई बहुउद्देशीय शिक्षण संस्था दिघोरी( नान्होरी) जि. भंडारा यांच्या विद्यमाने आयोजित या साहित्य संमेलनात मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन संस्थेचे सचिव आणि मुख्य संयोजक प्रा.डॉ.सुरेश खोब्रागडे,निमंत्रक प्रा. डॉ.युवराज खोब्रागडे स्वागताध्यक्ष संजय वनवे, आयोजन समिती अध्यक्ष रामेश्वर बिसेन, पदाधिकारी डॉ. रेवाराम खोब्रागडे, सुरेंद्र बन्सोड, सुमनताई कानेकर,मंगलमूर्ती किरणापुरे, आशाताई वनवे,प्रा. उमेश सिंगनजुडे, विष्णू चाचेरे, पंकज खांडेकर, आणि आयोजन समितीच्या सर्व पदाधिकाऱ्यांनी केले आहे.
0 Response to "लाखनी येथे ग्रामीण युवा साहित्य संमेलनाचे आयोजनसंमेलनाध्यक्षपदी प्रा. डॉ. संजयकुमार निंबेकर"
एक टिप्पणी भेजें