अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या चोरांवर गोंदी पोलिसांची कारवाई
गुरुवार, 16 अक्टूबर 2025
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
जालना :- अंबड तालुक्यातील पोलीस ठाणे गोंदि हद्दीत दिनांक 14 ऑक्टोंबर 2025 रोजी पहाटे तीन वाजेच्या सुमारास शहागड येथील जिल्हा परिषद शाळेच्या समोर एका ट्रॅक्टरच्या ट्रॉलीमध्ये चोरटी वाळू भरीत आहेत अशी माहिती गोंदी पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी सहायक पोलीस निरीक्षक खांडेकर साहेब यांना मिळाली. त्यावरून खांडेकर यांचे आदेशाने पोलीस उपनिरीक्षक हावले, पोलीस हवालदार हजारे, पोलीस हवालदार केंद्रे, पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप आवळे पोलीस कॉन्स्टेबल शेख , यांनी सदर ठिकाणी जाऊन खात्री केली असता दिनांक 14 ऑक्टोंबर 2025 रोजी पहाटे चार वाजेच्या सुमारास एक ट्रॅक्टर जिल्हा परिषद शाळा कडून मेन रोडवर येत असल्याचे दिसले. तेव्हा लोकेशन देणाऱ्या व्यक्तीने ट्रॅक्टर वरील चालकास इशारा केल्याने चालक वाळूने भरलेले ट्रॅक्टर घेऊन पळवून गेला. तेव्हा पोलिसांनी लोकेशन देणार इसम नामे संदीप रमेश धोत्रे यास विचारपूस करून त्यास ताब्यात घेऊन त्याच्या ताब्यातून एक सेल टॅक्स कार क्रमांक MH 21BQ7455 व एक मोबाईल मिळून आला .त्यावर पोलीस ठाणे गोंदी येथे लोकेशन देणारा इसम नामे संदीप रमेश धोत्रे व ट्रॅक्टर पळवून नेणाऱ्या इसम हरिश्चंद्र लहु धोत्रे राहणार शहागड तालुका अंबड यांचे विरुद्ध गुन्हा दाखल करून अटक करण्यात आली असून त्यांच्यावर कारवाई करण्यात आली . त्यांच्याकडून एकूण 16,005,000 लाख 5 हजार रुपयाच्या मुद्देमाल जप्त करण्यात आला
सदरची कार्यवाही पोलीस अधीक्षक अजय कुमार बंसल, अप्पर पोलीस अधीक्षक युष नेपनी,
उपविभागीय पोलीस अधिकारी अंबड सिद्धेश्वर धुमाळ, यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक पोलीस निरीक्षक आशिष खांडेकर, पोलीस हवालदार हजारे ,पोलीस हवालदार केंद्रे, पोलीस कॉन्स्टेबल प्रदीप हवाले ,पोलीस कॉन्स्टेबल शेख, पोलीस ठाणे गोंदी यांनी केली असून सदर गुन्ह्याचा पुढील तपास केंद्रे करीत आहेत.
0 Response to "अवैध वाळू वाहतूक करणाऱ्या चोरांवर गोंदी पोलिसांची कारवाई "
एक टिप्पणी भेजें