महिला उद्योजकता केंद्राअंतर्गत समर्थ महाविद्यालयात भरतकाम व केक प्रशिक्षण कार्यशाळा यशस्वी.
मंगलवार, 14 अक्टूबर 2025
Comment
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज".
लाखनी :- समर्थ महाविद्यालय लाखनी, महिला उद्योजकता केंद्राच्या वतीने दिनांक २३ सप्टेंबर ते १० ऑक्टोबर या कालावधीत प्रांतीय भरतकाम व केक प्रशिक्षण कार्यशाळा यशस्वीपणे पार पडली या समारोपीय कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान प्राचार्य डॉ. दिगांबर कापसे यांनी भूषविले आपल्या अध्यक्षीय मार्गदर्शनातून 'महिलांनी शिक्षणासोबतच उद्योगक्षम कौशल्य आत्मसात करून आत्मनिर्भर बनावे असे प्रतिपादन केले. प्रमुख अतिथी डॉ.सुनंदा देशपांडे यांनी महिलांच्या आत्मविश्वास व सर्जनशीलतेचे कौतुक केले. भरतकाम तज्ञ प्रशिक्षिका अश्विनी कडव आणि वृंदा पाखमोडे यांनी प्रशिक्षणार्थींना भरतकामाच्या विविध कलाकृतीचे उत्कृष्ट प्रशिक्षण दिले. केक प्रशिक्षका नफिसा पटेल लाखनी यांनी रसमलाई केक व कप केकचे विविध प्रकार सांगितले. प्रशिक्षणार्थींनी केक व कपकेक सजावटीचे तंत्र उत्साहाने आत्मसात केले.
या उपक्रमाचा उद्देश महिलांना स्वावलंबी बनविणे,कौशल्य विकास घडविणे आणि उद्योजकतेकडे प्रेरित करणे हा होता.या कार्यशाळेमुळे अनेक प्रशिक्षणार्थींना स्वयंरोजगार आणि नव्या व्यवसायाच्या संधीचा मार्ग मोकळा झाला.
प्राची सोनटक्के,आकांक्षा कांबळे या प्रशिक्षणार्थी विद्यार्थिनींनी महिला उद्योजकता केंद्राद्वारे नेहमी नवनवीन कौशल्याचे प्रशिक्षण मिळावे असे मत कार्यक्रमादरम्यान व्यक्त केले.
कार्यक्रमाच्या शेवटी सर्व प्रशिक्षणार्थींना व तज्ञ प्रशिक्षकांना मान्यवरांच्या हस्ते प्रमाणपत्र देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक डॉ. स्मिता गजभिये,संचालन प्रा. शितल कोमेजवार तर उपस्थितांचे आभार प्रा. मनिषा मदनकर यांनी मानले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रा.डॉ.संगीता हाडगे, प्रा. प्रतिभा वंजारी प्रा.स्वाती नवले, प्रा.पूजा नवखरे, प्रा. आस्था चेटूले, प्रा. नेहा हुकरे, प्रा. एकता जाधव, प्रा.पायल गोंधळे , रूपाली खेडीकर, प्रा. प्रेरणा चाचेरे, प्रा.राखी बावनकुळे,प्रा.सारिका माहुरे यांनी सहकार्य केले.
या कार्यशाळेत महाविद्यालयातील विद्यार्थ्यिनी तसेच स्थानिक महिला उद्योजिकांची उपस्थिती होती.
0 Response to "महिला उद्योजकता केंद्राअंतर्गत समर्थ महाविद्यालयात भरतकाम व केक प्रशिक्षण कार्यशाळा यशस्वी."
एक टिप्पणी भेजें