आदिवासी शिव विद्यालय गराडा येथे वाचन प्रेरणा दिन.
शुक्रवार, 17 अक्टूबर 2025
Comment
• क्रीडा स्पर्धेतील विजेत्या विद्यार्थीनींचा सत्कार
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्तपत्र प्रतिनिधी
लाखनी : आदिवासी शिव विद्यालय गराडा येथे भारताचे माजी राष्ट्रपती मिसाईल मॅन डॉ. ए. पी. जे. अब्दुलकलामयांची जयंती वाचन प्रेरणा दिन म्हणून उत्साहात साजरी करण्यात आली. या निमित्ताने विद्यालयात विद्यार्थ्यांनी विविध पुस्तकांचे वाचन केले. याचवेळी भंडारा येथे सुरू असलेल्या जिल्हा क्रीडा स्पर्धेत १७ वर्षे वयोगटातील लांब उडी क्रीडा प्रकारात द्वितीय स्थान पटकवून विभागीय स्तरावर निवड झालेली विद्यार्थीनी काजल मेश्राम हिचा सत्कार देखील करण्यात आला.
याप्रसंगी आयोजित कार्यक्रमात वर्ग ६वीची विद्यार्थीनी सृष्टी खंगार व ९ वीची विद्यार्थीनी सायली मेश्राम यांनी अब्दुल कलाम यांच्या जीवनाशी संबंधित पाठाचे वाचन केले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी एन. एस. ढवळे व प्रमुख अतिथी म्हणून एन.पी. इलमकार, पी.बी. टेंभूर्णेकर, व्ही.ए. पालांदूरकर, डी. आर. कुबडे, के. जे. वणवे, एस. एस. खंडारे, आर. जी. तितीरमारे, डी. एम. शामकुवर व सर्व कर्मचारी उपस्थित होते. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व्ही. ए. पालांदूरकर यांनी केले व आभार पी. बी. टेंभूर्णेकर यांनी मानले.
0 Response to "आदिवासी शिव विद्यालय गराडा येथे वाचन प्रेरणा दिन."
एक टिप्पणी भेजें