चिंचोली नकीब येथील मातंग समाजाच्या युवकांचा घात कि पात. मृत्यू संशयाच्या भोवऱ्यात.
शुक्रवार, 17 अक्टूबर 2025
Comment
सतिश लोखंडे.
"साप्ताहिक जनता की आवाज"
छत्रपती संभाजी नगर :- फुलंब्री तालुक्यातील चिंचोली नकीब येथील मयत तरुण गोकूळ सुरेश दणके हा दिनांक २ ऑक्टोबर 2025 रोजी कामावर गेला परंतु तो त्या दिवशी घरी परत आलाब नाही घरच्यांनी त्याचा बराच शोधाशोध केला मात्र तो मिळाला नाही. ०३ ऑक्टोबर रोजी बडोद चाजार पोलिस ठाणे हद्दीतील बाबरा शिवारातील तलावातील फक्त दोन ते तीन फुट खोल पाण्यात त्याचा अर्थ नग्न अवस्थेत संशयास्पद मृत्यू आढळून आला. मयताच्या कुटुंबाचा आरोप आहे कि जुन्या वादातून आमच्या मुलाची हत्या करण्यात आली आहे. व हि
घटना कट रचून घातपात केल्याचे सांगत आहे. ज्या ठिकाणी मयत गोकुळ दणके याचा मृतदेह आढळून आला त्याच्या काही अंतरावर संशयित आरोपीचे घर आहे. ०२ ऑक्टोबर ते आज रोजी १६ ऑक्टोबर पर्यंत पंधरा दिवसांच्या कालावधीत
पोलिस प्रशासन नुसता गुन्हा दाखल करून घेण्यास चालढकल पणा करत आहे. दिनाक १३ ऑक्टोबर रोजी लहुजी क्रांती सेनेच्या सिल्लोड तालुका वतीने वडोद बाजार पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक सुनील इंगळे तसेच पोलिस उपनिरीक्षक
सचिन क्षिरसागर यांची भेट घेऊन त्यांना सदर घटनेमध्ये गुन्हा दाखल करून संशयित आरोपींना अटक करावी या मागणीसाठी निवेदन देण्यात आले. सहाय्यक पोलीस निरीक्षक सुनील इंगळे यांनी सांगितल्याप्रमाणे काल मयताचे पिडीत कुटुंब दुपारपासून
ते सायंकाळ पर्यंत गुन्हा दाखल करण्यासाठी वडोद बाजार पोलिस ठाण्यात ठाण मांडून बसले होते. तरी सुद्धा गुन्हा दाखल करण्यात आला नाही. तरी पोलिस प्रशासनाने गुन्हा दाखल करून गुन्हेगारास तात्काळ अटक कराची असे मयत कुटुंबाचे म्हणणे आहे..
0 Response to "चिंचोली नकीब येथील मातंग समाजाच्या युवकांचा घात कि पात. मृत्यू संशयाच्या भोवऱ्यात."
एक टिप्पणी भेजें