धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणजे बाबासाहेबांनी दिलेला स्वउत्कर्षाचा , उन्नतीचा मार्ग :- सुनिता टेंभूर्णे.
मंगलवार, 14 अक्टूबर 2025
Comment
संकलन
हर्षवर्धन देशभ्रतार
14 आँक्टोंबर 1956 दिवस अशोक विजयादशमी इ.स.पू. तिस-या शतकात याच दिवशी सम्राट अशोकांनी बौध्द धम्माची दीक्षा घेतली होती, सम्राट अशोकाने केलेली ही मोठी धम्म क्रांती होती . आणि हाच दुवा घेऊन विश्वरत्न डाँ.भिमराव रामजी आंबेडकर यांनी महाराष्ट्राच्या मध्यभागी असलेल्या नागलोक भुमीत नागपूर या ठिकाणी पूज्य भंदत महास्थविर चद्रंमूणी यांच्या कडून पांढ-या शूभ्र परिधान केलेल्या वस्त्रात माई सविता आंबेडकर यांच्या समवेत सात लाख अनुयायांनी धम्म दिक्षा घेतली व हा दिवस इतिहासात सोनेरी अक्षरात लिहल्या गेला.
अत्यंत शारिरीक पिडा असतानासुद्धा बाबासाहेब नागपूर नगरित माई आंबेडकरांसोबत असतात . प्रत्येक गोष्टीचा बारकाईने विचार करून अगदी नियोजित केली गेली होती.
ही दिक्षा माणसांचं आयुष्य बदलविणारी होती . बाबासाहेब लहान पणापासूनच त्यांच्या जडणघडणीत धर्माविषयी आदर होता. बाबासाहेबांसारखे दुःख द व हलाकीचे आयुष्य जगणारे एकमेव
आणि त्याही परिस्थितीत देशाचा ,समाजाचा व माणसाला माणूस बनण्यासाठी चा आटोकाट प्रयत्न प्रचंड उर्जा देणारा आहे. *धर्म माणसासाठी असतो माणूस धर्मासाठी नाही* कारण धर्म ही स्वतः जगण्याची आचरण करण्याची गोष्ट आहे. दुस-यावर लादण्याची किंवा धार्मिक तेड़ निर्णय करण्याची नाही.
धम्म हा आचरण करण्याचा विषय आहे , विज्ञान वादी दृष्टीकोन ठेवून वाटचाल करण्यासाठी आहे.
इथे अंधश्रद्धा किंवा ईच्छा प्राप्तीचा कुठलाही मोह नाही पण धम्माचे आचरण केल्यास स्वतः कुटुंबाचा ,समाजाचा ,देशाचा नक्कीच भलं होत.
नागपूर च्या दिक्षा भूमीवर देशातील जनता या दिवशी कानाकोपऱ्यातून जमा होते .बाबासाहेबांप्रतीअसलेली अपार श्रद्धा व विचारांची जबाबदारी उरावर आहे हा भाव दिसतो .
अनेक पुस्तकांचे स्टांँल असतात ,लाखों रुपयांची पुस्तकांची विक्री या एका दिवसी होते , जणू काही *वाचाल तर वाचाल* या म्हणी प्रत्यक्षात उतरवण्यासाठी व महामानवाच्या विचारांणी मन, मेंदू, मनगट बळकट करण्यासाठी पोषण आहार मिळावा असेच प्रत्ययास येते
.
तुझेच धम्मचक्र फिरे या जगावरी
व या जगात शांतता नांदो.
देश प्रगतीपथावर जावो हाच संदेश या दिवशी अत्यंत मोलाचा वाटतो.
0 Response to "धम्मचक्र प्रवर्तन दिन म्हणजे बाबासाहेबांनी दिलेला स्वउत्कर्षाचा , उन्नतीचा मार्ग :- सुनिता टेंभूर्णे."
एक टिप्पणी भेजें