केंद्रीय मानवाधिकार संघटन नई दिल्ली भंडारा जिल्हा चे अभिनव उपक्रम.
शनिवार, 4 अक्टूबर 2025
1 Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्त प्रतिनिधी
भंडारा: - ६९ व्या धम्मचक्र अनुप्रवर्तन दिनानिमित्त दीक्षाभूमी परिसरात अन्नदान, बाबासाहेब आंबेडकरांनी केलेल्या कार्यावर बहुपर्यायी प्रश्नोत्तरी स्पर्धा व महापुरुषांच्या वैचारिक पुस्तकांचे मोफत वितरण
बोधिसत्व, परमपूज्य भारतरत्न विश्वभूषण डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी आपल्या लाखो अनुयायांसह विजयादशमीच्या दिवशी, १४ ऑक्टोबर १९५६ रोजी नागपूर येथे बौद्ध धम्माची दीक्षा घेतली. डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी भारतात लुप्तप्राय झालेल्या बौद्ध धम्माच्या चक्राला पुनः गतिमान केले आणि "धम्मचक्राचे पुनःसंचलन" केले. त्या दिवसापासून हा दिवस देशभरात धम्मचक्र अनुवर्तन दिन म्हणून दरवर्षी साजरा केला जातो. या दिवशी देश-विदेशातून लाखो अनुयायी दीक्षाभूमी नागपूर येथे बाबासाहेब व तथागत गौतम बुद्ध यांना अभिवादन करण्यासाठी व बौद्ध धम्माची दीक्षा घेण्यासाठी येतात.
या निमित्ताने डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि तथागत गौतम बुद्ध यांना वंदन करून, दीक्षाभूमीवर येणाऱ्या अनुयायांना असुविधा होऊ नये म्हणून दरवर्षीप्रमाणे यावर्षी देखील केंद्रीय मानवाधिकार संघटन, नवी दिल्ली, द्वारा भंडारा जिल्हा तर्फे भोजनदान करण्यात आले. तसेच बाबासाहेबांच्या मानवतावादी विचारांचा प्रसार प्रत्येक घरापर्यंत व्हावा म्हणून मोफत पुस्तकांचे वितरण करण्यात आले.
या प्रसंगी "संविधान निर्माता भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर आणि समता, शांती व अहिंसेचा संदेश देणारे महाकरुणीक तथागत गौतम बुद्ध यांच्या जीवनकार्यावर आधारित बहुपर्यायी प्रश्नोत्तरी परीक्षा २०२५ घेण्यात आली. या प्रश्नोत्तरी परीक्षेत नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभाग नोंदविला. परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ५०० परीक्षार्थ्यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले व ५०० संविधानाच्या प्रती तसेच डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या सामाजिक कार्यावर आधारित पुस्तके वाटण्यात आली.
या प्रसंगी केंद्रीय मानवाधिकार संघटन नवी दिल्लीचे राष्ट्रीय अध्यक्ष डॉ. मिलिंद दहीवले व महाराष्ट्र राज्याध्यक्ष तथा उपक्रमाचे संयोजक डॉ. देवानंद बी. नंदागवळी होते, महेंद्र तिरपुडे, सोपान रंगारी, उत्तम मेश्राम, शिलानंद नंदागवळी, अखिलेश गोंडाने, प्रवीण भोंद, डॉ. अमृत नारनवरे, डॉ. मंगेश रहांगडाले, डॉ. सुशांत गजभिये, कमलताई हुमणे, प्रा. प्रियदर्शन सोनटक्के, मंगेश हुमणे, आशाताई साखरे, सचिन गेडाम, संजय बांगर, अखिलेश वाघमारे, नासिक चवरे, लेखचंद रुसेसरी, दुर्योधन खोबरागडे, भिमराव रामटेके, संजय रंगारी, सिद्धार्थ वासनिक, लालीसाहेब, विनोद रंगारी, शामराव चवरे, नरेश हुमणे, विशाखा रंगारी, आशा साखरे, बेबिनंदा नंदागवळी, सोमदेव चोपकर, संदेश गजभिये, नानाभाऊ घरडे, भिमराव घरडे, संदेश वासनिक आदी कार्यकर्ते उपस्थित होते.
या कार्यक्रमाला यशस्वी करण्यासाठी केंद्रीय मानवाधिकार संघटन, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य शाखेचे अध्यक्ष डॉ. देवानंद बी. नंदागवळी, महेंद्र तिरपुडे, सोपान रंगारी, भिक्षुणी संघप्रिया, उत्तम मेश्राम, डॉ. प्रफुल बोरकर, सचिन गेडाम, वैशाली गजभिये, शिलानंद नंदागवळी, अखिलेश गोंडाने, प्रवीण भोंदे, संजय बांगर, सोमदेव चोपकर, संदेश गजभिये, जुही घरडे, शामकला गजभिये, विपश्यना नंदागवळी, अनुज गजभिये, निलेश वालकर आदी कार्यकर्त्यांनी अथक परिश्रम घेऊन उपक्रम यशस्वी केले.
अत्यंत उत्कृष्ट उपक्रम... आजचा विद्यार्थी हा उद्याच्या देशाचा भविष्य आहे... आणि म्हणून आजच्या विद्यार्थ्याला बाबासाहेबांची खरी ओळख करून देने आवश्यक आहे. ज्यामुळे देशात लोकशाही व संविधान टिकून राहील. नाहीतर देशात हुकूमशाहीचा उगम थोडाही वेळ होण्यास बाकी नाही...
जवाब देंहटाएं