१४ ऑक्टोबरला मुंबईत.महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन कृती समिती चा महामोर्चा.
सोमवार, 13 अक्टूबर 2025
Comment
"साप्ताहिक जनता की आवाज"
न्यूज नेटवर्क
मुंबई :- महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन कृती समितीच्या वतीने दि. १४ ऑक्टोबर रोजी आझाद मैदान मुंबई येथे बौद्ध समाजाचा अति विशाल महामोर्चा केंद्रीय सामाजिक न्यायमंत्री ना. रामदास आठवले यांच्या नेतृत्वा खाली आयोजित करण्यात आला आहे.
बिहारचा मंदिर व्यवस्थापन (बी टी एम सी ऍक्ट 1949 ) कायदा रद्द करण्यात यावा. बुद्धगया येथील महाविहार समिती केवळ बौद्धाची असावी, ट्रस्ट मधील सर्वच सदस्य बौद्ध आणि चेअरमन सुद्धा बौध्द असावा या मागणीसाठी देशातील आणि महाराष्ट्रातील सर्व रिपब्लिकन गट, बौद्ध आंबेडकरी संघटना, भिक्कू संघटना बौध्द अनुयायी आणि सर्व पक्षीय बौद्ध नेते एकत्र आले असून १४ ऑक्टोबर रोजी संघर्ष नायक ना. रामदास आठवले यांच्या नेतृत्वा खाली आझाद मैदान मुंबई येथे महामोर्चा काढण्यात येणार आहे.
तथागत भगवान गौतम बुद्धांनी मानव जातीला ज्ञानाचा, समतेचा, विज्ञानवादी आदर्श जीवनमार्ग म्हणून बौद्ध धम्म दिला आहे. अंधश्रद्धा, पुनर्जन्म, श्राद्ध, पिंडदान, या कर्मकांडाला तथागथानी नाकारले आहे. परंतु ज्या ठिकाणी भगवान बुद्धांना ज्ञानप्राप्ती झाली त्या महाबोधी महाविहार परिसराला अंधश्रद्धा, कर्मकांडाने वेढले आहे. त्यातून महाबोधी महाविहाराच्या मुक्तीसाठी बौद्धानी संघर्ष सुरु केला असून बुद्धगयेत बौद्ध भिक्कू मार्फत भन्ते विनाचार्य यांच्या मार्गदर्शना खाली आंदोलन सुरु केले आहे.
१४ऑक्टोबर रोजी निघणाऱ्या महामोर्चात रिपब्लिकन नेते प्रा. जोगेंद्र कवाडे, रिपाई नेते डॉ राजेंद्र गवई, खासदार चंद्रकांत हंडोरे, खासदार वर्षा गायकवाड, माजी मंत्री अविनाश महातेकर, साहित्यिक अर्जुन डांगळे, आदि. नेते मंडळी सहभागी होणार आहेत.
या महामोर्चात सर्व आंबेडकरवादी जनतेने सहभागी व्हावे असे आवाहन रिपाईचे राष्ट्रीय सचिव ठाणे जिल्हा निरीक्षक सुरेश बारसिंग, महाराष्ट्र राज्य सरचिटणीस गौतम सोनावणे, राष्ट्रीय उपाध्यक्ष सुरेश सावंत, राष्ट्रीय सचिव दयाल बहादुरे, राज्य सह सचिव राहुल हंडोरे, दलित पॅन्थर राष्ट्रीय अध्यक्ष बाळासाहेब पडवळ, महाराष्ट्र अध्यक्ष डॉ भोसले यांनी एका प्रसिद्धी पत्रकाद्वारे केले आहे.
0 Response to "१४ ऑक्टोबरला मुंबईत.महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन कृती समिती चा महामोर्चा."
एक टिप्पणी भेजें