मुख्याध्यापक धकाते यांचा सेवानिवृत्ती सत्कार.
गुरुवार, 2 अक्टूबर 2025
Comment
नरेंद्र मेश्राम
"साप्ताहिक जनता की आवाज"
पालांदूर /चौ. :- येथील गोविंद प्राथमिक विद्यालयातील मुख्याध्यापक अंबादास धकाते यांचा सेवानिवृत्ती सत्कार समारंभ शाळेतर्फे करण्यात आला.
पाहुण्यांच्या हस्ते सत्कारमूर्ती श्री.अंबादास धकाते व त्यांच्या पत्नी कुसूम धकाते यांचा शाल श्रीफळ व भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला.
याप्रसंगी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे सदस्य शिवलाल रहांगडाले होते.तर प्रमुख पाहुणे म्हणून राष्ट्रीय शिक्षण संस्थेचे अध्यक्ष आल्हाद भांडारकर , सदस्य अर्चना रणदिवे, प्राचार्य आनंदराव मदनकर,मा.मुख्याध्यापक दयाराम हटवार,मा.मुख्याध्यापिका भुमिका नवखरे ,भदाडे मॅडम,रुपेश नागलवाडे, नारायण थेर , उपस्थित होते.
श्री,धकाते यांनी,३९,वर्षाची सेवा केली.त्यादरम्यान आपल्या अध्यापन कौशल्यातून अनेक पिढ्या घडविल्या, शिस्तप्रिय, कर्तुत्ववान शिक्षक असून योग्य ज्ञान आणि कौशल्ये प्रदान करून विद्यार्थ्यांचे भविष्य घडविल्याचे मान्यवरांनी सांगितले.कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुख्याध्यापिका अश्विनी कांबळे हिने केले, संचलन जयदेव मेश्राम यांनी केले तर आभार किशोर खंडाईत यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी रामेश्वर लुटे, वैशाली शिवणकर, इंदिरा जांभुळकर, मंजुषा नंदूरकर, लक्ष्मी मुरकुटे, शुभांगी जांभुळकर,ममता भेदे, भाग्यश्री खंडाईत यांनी सहकार्य केले.
0 Response to "मुख्याध्यापक धकाते यांचा सेवानिवृत्ती सत्कार."
एक टिप्पणी भेजें