वळद पुनर्वसन येथे समाज मंदिर लोकार्पण सोहळा व धम्मचक्र परिवर्तन दिन उत्साहात साजरा.
मंगलवार, 14 अक्टूबर 2025
Comment
संजीव भांबोरे
"साप्ताहिक जनता की आवाज"
भंडारा :- तालुक्यातील वळद पुनर्वसन येथे 14 ऑक्टोंबर 2025 ला धम्मचक्र परिवर्तन दिनानिमित्त समाज मंदिर लोकार्पण सोहळा पार पडला . या समाज मंदिराचे उद्घाटन पंचायत समिती सदस्य सीमा रामटेके यांनी केले तर सहउद्घाटक म्हणून बोरकर ग्रामसेवक उपस्थित होते . कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी संजीव भांबोरे ब्ल्यू स्टार्म टीव्ही न्यूज चॅनलचे महाराष्ट्र प्रमुख तथा दैनिक माझा
मराठवाडा चेविदर्भ विभागीय संपादक संजीव भांबोरे उपस्थित होते. प्रमुख पाहुणे पंचायत समिती सदस्या काजल चवळे, जगदीश उईके, प्रियंका धुळसे ,मंगेश जनबंधू, ललित मेश्राम, राजू हलमारे, असंख्य मान्यवर उपस्थित होते .
कार्यक्रमाचे संचालन ब्ल्यू टार्म टीव्ही न्यूज चॅनलच्या अँकर संजना भांबोरे यांनी केले तर आभार राजेश मेश्राम यांनी मानले. कार्यक्रम यशस्वी करण्याकरता बुद्ध विहार चॅरिटेबल ट्रस्टचे अध्यक्ष प्रशांत वंजारी, उपाध्यक्ष शीलवंत खोब्रागडे सचिव कवडू बनसोड, सहसचिव अक्षय खोब्रागडे व मंडळातील सर्व सदस्यांनी सहकार्य केले. त्याचप्रमाणे लोकांच्या मनोरंजनाकरिता प्रबोधनात्मक आर्केस्ट्रा कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.
0 Response to "वळद पुनर्वसन येथे समाज मंदिर लोकार्पण सोहळा व धम्मचक्र परिवर्तन दिन उत्साहात साजरा. "
एक टिप्पणी भेजें