-->

Happy Diwali

Happy Diwali
कवलेवाडा रेती घाटावर रेतीचा अवैध उपसा सुरूच.T

कवलेवाडा रेती घाटावर रेतीचा अवैध उपसा सुरूच.T

"साप्ताहिक  जनता की आवाज" 
 वृत्तपत्र प्रतिनिधी

तुमसर :- तालुक्यातील कवलेवाडा रेती घाटावर सध्या अवैध रेती उपशाचे सत्र सुरू असून, दिवसेंदिवस रेती माफियांचा धाडस वाढत चालले आहे. गावातूनच ट्रॅक्टरद्वारे मोठ्या प्रमाणात रेतीची वाहतूक केली जात असून, यामुळे ग्रामस्थांच्या जीवितास गंभीर धोका निर्माण झाला आहे.

मध्यप्रदेश व महाराष्ट्र राज्याच्या सीमेवर असलेल्या कवलेवाडा रेती घाटातून रोज रात्री तसेच सकाळच्या वेळी रेतीचे ट्रॅक्टर गावाच्या मध्यवस्तीमधून वेगाने धावत असतात. लहान मुलं, वृद्ध आणि शाळेत जाणारे विद्यार्थी यांच्यावर अपघाताचा धोका सतत निर्माण झाला आहे. या बेकायदेशीर वाहतुकीमुळे रस्त्यांची दयनीय अवस्था

झाली असून, धूळ आणि आवाजामुळे ग्रामस्थ त्रस्त झाले आहेत. याबाबत नागरिकांनी अनेक वेळा संबंधित अधिकाऱ्यांकडे तक्रार केली असली तरी, स्थानिक सरपंच, पोलिस पाटील तसेच पोलिस व महसूल प्रशासन यांच्याकडून कोणतीही ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. उलटपक्षी, गावात चर्चा आहे की, हे अधिकारी रेती तस्करांकडून आर्थिक लाभ घेऊन् मौन बाळगतात. त्यामुळे गावकऱ्यांमध्ये प्रचंड नाराजी आणि भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

0 Response to "कवलेवाडा रेती घाटावर रेतीचा अवैध उपसा सुरूच.T"

एक टिप्पणी भेजें

Ads on article

Advertise in articles 1

advertising articles 2

Advertise under the article