भंडारा जिल्हा सहित संपूर्ण राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा.
शनिवार, 4 अक्टूबर 2025
Comment
• समता सैनिक दलाचे तहसीलदार मार्फत मुख्यमंत्र्यांना निवेदन
"साप्ताहिक जनता की आवाज"
वृत्त प्रतिनिधी
भंडारा :- भंडारा जिल्हा साहित्य राज्यात सततच्या होणाऱ्या पावसामुळे अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पाऊस, गारपीट व मुसळधार पावसाने थैमान घातल्यामुळे खरीप हंगाम पूर्णपणे उद्ध्वस्त झाला आहे. यात शेतकऱ्यांवर प्रचंड हानी झाली ही केवळ वैयक्तिक हानी नसून, राज्याच्या संपूर्ण अर्थव्यवस्थेवर गंभीर परिणाम करणारी हानी आहे. पिकांचे नुकसान, व जनावरांसाठी चारा, तसेच शेतकरी कुटुंबांचे उद्ध्वस्त होणारे भविष्य या सर्व परिस्थितीने शेतकरी आत्महत्यांचे प्रमाण आणखी वाढण्याचा धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे भंडारा जिल्हा असेल संपूर्ण महाराष्ट्र सरसकट ओला दुष्काळ जाहीर करावा अशी मागणी समता सैनिक दल तर्फे तहसीलदार वैभव पवार मार्फत मुख्यमंत्र्यांना देण्यात आलेल्या निवेदनातून केली आहे. भंडारा जिल्हा हा भात उत्पादक जिल्हा म्हणून ओळखला जातो. या जिल्ह्यामध्ये सर्वात जास्त भाताची शेती केली जाते परंतु महिना भरापासून सततच्या, होणाऱ्या मुसळधार पावसामुळे भात शेती पूर्णतः नष्ट झालेली आहे. शेतकऱ्यांच्या तोंडी आलेले घास निसर्गाने हिसकावून घेतला आहे.
त्यामुळे महाराष्ट्र राज्यात ओला दुष्काळ घोषित करावे, बाधित शेतकऱ्यांना नुकसानभरपाई थेट बँक खात्यात जमा करावी; मध्यस्थ टाळावा, शेतकऱ्यांच्या कर्जाची तातडीने माफी करून पीककर्जाची सोय करावी, नवीन व जनावरांसाठी चारा, छावण्या पाण्याची व्यवस्था तात्काळ सुरू करावी, शेतीचे विज बिल माफ करून इतर शासकीय देयकांमध्ये तातडीची सवलत द्यावी, शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी विशेष कार्यबल (Special Task Force) जिल्हानिहाय स्थापन करावे.
शासनाने या परिस्थितीची तात्काळ दखल घेणे अपरिहार्य आहे. आजच निर्णय न झाल्यास उद्या उशीर होईल. अशा प्रकारची मागणी समता सैनिक दल लाखांदूर च्या वतीने मुख्यमंत्र्यांना निवेदनातून केली आहे. सदर निवेदन देतेवेळी तालुकाप्रमुख रोशन फुले खुशाल बोरकर, हरिदास खोब्रागडे, युवराज शुखदेवे, पंडित गायकवाड, कन्हैया जांभुळकर, निर्भय गायकवाड, भीमराव गायकवाड, मुकेश गणवीर, किशोर सतीमेश्राम, झकास फुलुके, सुरज प्रधान, राहुल राऊत, मनोहर बोरकर, दिनेश भाऊ वासनिक, चेतन सूर्यवंशी, मोदक जी रामटेके आदी मान्यवर उपस्थित होते.
0 Response to "भंडारा जिल्हा सहित संपूर्ण राज्यात ओला दुष्काळ जाहीर करा."
एक टिप्पणी भेजें