पहेला येथे भव्य भजन स्पर्धेचे संपन्न.
रविवार, 12 अक्टूबर 2025
Comment
• गुरुदेव सेवा मंडळ च्या वतीने स्पर्धेचे आयोजन.
कुलदीप गधें
"साप्ताहिक जनता की आवाज"
पहेला :- राष्ट्रसंत तुकडोजी महाराज यांच्या पुण्यतिथीनिमित्त गुरुदेव सेवा मंडळ, पहेला येथे भव्य भजन स्पर्धेचे आयोजन मोठ्या उत्साहात संपन्न झाला. या स्पर्धेत परिसरातील २४ भजनी मंडळांनी सहभाग घेतला होता.
कार्यक्रमाचे उद्घाटन मा. सौ. कविताताई उईके (जिल्हा परिषद अध्यक्ष) यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख अतिथी म्हणून मा. सौ. काजलताई चवळे (पं. स. सदस्य), मा. श्री. दयानंद नखाते (अध्यक्ष, हनुमान देवस्थान समिती), सखाराम चवळे (अध्यक्ष, से. सह संस्था), सौ. मंगलाताई ठवकर (सरपंच, पहेला), विकास भुरले (तंटामुक्ती अध्यक्ष), सुशील बांडेबुचे (उपसरपंच), भोजराज भोयर (सामाजिक कार्यकर्ता), चंद्रशेखर खराबे (पो. पा. पहेला) तसेच प्रशांत बांडेबुचे आणि गोपाल चवळे आदी मान्यवर उपस्थित होते.
भजन स्पर्धेत महिला आणि पुरुष मंडळांनी संत साहित्यावर आधारित भजने सादर करून उपस्थित भक्तांना अध्यात्मिक आनंद दिला.
प्रथम – ज्ञानेश्वरी भजन मंडळ, पहेला,द्वितीय – जय दुर्गा भजनी मंडळ, पहेला, तृतीय – आदर्श भजनी मंडळ, रावणवाडी,चतुर्थ – जय दुर्गा महिला भजनी मंडळ, सोनेगाव
तर पाचवा – त्रिमूर्ती भजन मंडळ, वळद.
विजेत्या मंडळांना अशा पद्धतीने बक्षीस देण्यात आले. ₹5001, ₹4001, ₹3001, ₹2001 आणि ₹1001 अशी रोख बक्षिसे तसेच प्रमाणपत्रे देण्यात आली.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी सखारामजी चवडे, रामाजी खराबे, कृष्णाजी कालकर, आशाताई ठवकर, प्रशांत बांडेबुचे, महादेव खराबे, प्रवीण ठवकर, विलास धांडे, मनोहर खराबे, गणपत कावळे, घनश्याम चवळे, गंगाधर सावरकर, प्रकाश मेश्राम, नरेश बोरकर, कुडलिक लोदासे, मधुकर ठवकर आदी कार्यकर्त्यांनी मोलाचे योगदान दिले.
कार्यक्रमाच्या शेवटी राष्ट्रसंत तुकडोजी महाराजांना अभिवादन करून सर्व उपस्थित मान्यवर आणि ग्रामस्थांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
0 Response to "पहेला येथे भव्य भजन स्पर्धेचे संपन्न."
एक टिप्पणी भेजें